🕒 1 min read
मुंबई : ३८ दिवसांनंतर राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र खाते वाटप अजूनही झालेले नाही त्यावरूनच आज काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे. “राज्यात एवढी बिकट परिस्थिती असूनही मंत्रिमंडळ विस्तारासाठी ४० दिवस लावले आता खाते वाटपासाठीही ४० दिवस घालवणार का? असा प्रश्न पडला आहे. यामुळेच सरकारचं कामकाजही ठप्प झालेलं आहे.”, असं चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले.
तसेच अंबादास दानवेंच्या निवडीवरून नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले कि, “महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व एकत्रित आहोत. आमच्यातील एकोपा राहायला हवा हीच आमची अपेक्षा आहे. परंतु कोणतेही महत्वाचे निर्णय घेत असताना काँग्रेसला विश्वासात घेतलं जावं. निर्णय हे समन्वयाने व्हावे, एवढीच आमची किमान अपेक्षा आहे.”
महत्वाच्या बातम्या:
- Anil bonde | शिंदे आणि फडणवीस हे सर्वसमावेशक मंत्रिमंडळ बनवतील- अनिल बोंडे
- Ramdas Kadam । ‘शिवबंधन बांधून आयुष्यभरासाठी राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला’, कदमांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
- Ravi Rana | निराश होण्याच कारण नाही मला लवकरच मंत्री पद मिळेल – रवी राणा
- Ramdas Kadam । बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रीय महापुरूष, कुणाच्या घरची मालमत्ता नाहीत, कदमांचा थेट ठाकरेंवर प्रहार
- Navneet Rana | अमरावतीत सुरक्षा रक्षकांना बांधल्या नवनीत राणा यांनी राख्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
