अमरावती : महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शिंदे गटातील आणि भाजपातील एकूण १८ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात एकाही अपक्ष आमदाराला आणि महिला आमदाराला स्थान देण्यात आले नाही. दरम्यान भाजप अपक्ष आमदार रवी राणा यांना मंत्रिपद देईल अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. मंत्रिमंडळात राणांचा समावेश अद्याप करण्यात आलेला नाही. त्यावर आज रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आज रक्षाबंधन सणानिमित्ताने अमरावतीत युवा स्वाभिमान पार्टीतर्फे रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रवी राणा याना मतदारसंघातील अनेक महिलांनी राख्या बांधल्या. त्यावेळी उपस्थित जनतेला संबोधित करताना राणा म्हणाले कि, “मला मंत्रिपद मिळालं नसल्याने अमरावतीतील माता भगिनी नाराज आहेत. पण मला त्यांना सांगायचं आहे कि, तुम्ही निराश होण्याच काही कारण नाही. कारण आता फक्त अर्ध मंत्रिमंडळ स्थापण झालं आहे, अर्ध अजूनही बाकी आहे. मी गेल्या १० वर्षापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. ते लोकांचा विचार करणारे आणि लोकांमध्ये मिसळणारे नेते आहेत. त्यांचं अमरावतीकडे पूर्ण लक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे अमरावती जिल्ह्याला नक्कीच न्याय देतील.”
अमोल मिटकरींचा राणांना टोला
अमोल मिटकरी यांनी आज ट्विट केले कि, “हिंदुत्वासाठी जीवाचं रान करणारे रवी राणा, हनुमान चालीसा खिशात घालुन फिरणारे रवी राणा आता अखेर वैफल्यग्रस्त झालेत. देवेंद्र फडणवीस ठरवतील त्यांना मंत्री पद मिळतं याचा अर्थ त्यांना नव्याने ‘देवेंद्र चालीसा’ वाचण्याची गरज आहे. रवीराणा यांना धर्म रक्षणार्थ मंत्रिपद मिळालेच पाहिजे.”, असा खोचक टोला त्यांनी रवी राणा यांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Navneet Rana | अमरावतीत सुरक्षा रक्षकांना बांधल्या नवनीत राणा यांनी राख्या
- Rakshabandhan । पोलीस भगिनीकडून राखी बांधून घेत शिंदे-फडणवीसांनी केले रक्षाबंधन साजरे
- Jayant Patil | भाजपाला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं – जयंत पाटील
- NCP VS BJP । राष्ट्रवादीची चिंता वाढणार; फडणवीस पुण्याचे पालकमंत्री, चंद्रकांत पाटलांचे संकेत
- Priyanka Chaturvedi | “पुढचे १० दिवस शिंदे गटासाठी चांदणी रात्र, पण त्यांनतर…”; प्रियंका चतुर्वेदी आक्र


