🕒 1 min read
अमरावती : महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये काल मोठा सत्ताबदल झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यासोबतच आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते सात पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व करणार आहेत. या आघाडीला अपक्षांचा पाठिंबा आहे. महाआघाडीत जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, हम आणि डावे पक्ष आहेत. यावरच काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले होते. नितीश कुमारांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे आहे, असं शरद पवार म्हणाले होते. त्यावरून आज खासदार अनिल बोंडे यांनी पवारांवर खोचक टीका केली आहे.
“खरं पाहिलं तर नितीश कुमारांबद्दल अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यावर मी पुन्हा प्रतिक्रिया देणं काही योग्य नाही. परंतु, पवार साहेबांना अशी पलटी मारण्याची खूप सवय आहे. त्यामुळे पवार साहेबांना नितीश किमारांचं योग्य वाटणं हे साहजिक आहे. कारण बुडत्याला काठीचा आधार असं म्हणतात. त्यामुळे ते काठी शोधतच आहेत. त्यामुळे जर त्यांना नितीश कुमारांच्या रुपात काठी दिसली असेल तर त्यांना आनंद होईलचं.”, अशी खोचक टीका अनिल बोंडे यांनी केली आहे.
पवार नक्की काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले होते कि, “महाराष्ट्रात शिवसेनेत फूट कशी पडेल, अशी परिस्थिती निर्माण केली गेली. अशीच खेळी बिहारमध्ये सुरू होण्याआधीच नितीश कुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आज भाजपाचे नेते त्यांच्यावर टीका टिप्पणी करत आहेत. परंतु नितीशकुमारांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे आहे. भाजपाच्या अध्यक्षांनी असे वक्तव्य केले, की प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही. ते शिल्लक राहणार नाहीत आणि आमचा एकच भाजपा हा पक्ष देशामध्ये शिल्लक राहील. त्यामुळेच नितीश कुमारांची तक्रार आहे, तीच तक्रार ही अकाली दलाची आणि इतर मित्र पक्षांची आहे.”
महत्वाच्या बातम्या:
- Anil bonde | शिंदे आणि फडणवीस हे सर्वसमावेशक मंत्रिमंडळ बनवतील- अनिल बोंडे
- Ramdas Kadam । ‘शिवबंधन बांधून आयुष्यभरासाठी राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला’, कदमांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
- Ravi Rana | निराश होण्याच कारण नाही मला लवकरच मंत्री पद मिळेल – रवी राणा
- Ramdas Kadam । बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रीय महापुरूष, कुणाच्या घरची मालमत्ता नाहीत, कदमांचा थेट ठाकरेंवर प्रहार
- Navneet Rana | अमरावतीत सुरक्षा रक्षकांना बांधल्या नवनीत राणा यांनी राख्या


