🕒 1 min read
अमरावती : महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शिंदे गटातील ९ आणि भाजपातील ९ अशा एकूण १८ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात एकाही अपक्ष आमदाराला आणि महिला आमदाराला स्थान देण्यात आले नाही. त्यावरून राजकीय वर्तुळातुन अनेक प्रतिक्रिया आल्या. तर दुसरीकडे अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांना मंत्रिपद मिळाले नसल्याने ते एकनाथ शिंदेंवर आणि भाजपवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यावरच आज खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीने अनिल बोंडे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा ते म्हणाले कि, “सर्वप्रथम सर्व नवनियुक्त मंत्र्यांचं अभिनंदन! ज्यांना मंत्रिपद मिळालं नसेल त्यांना दुःख वाटणं साहजिक आहे. पण मुख्यंमत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे कि, लवकरच पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होईल. त्यावेळी सर्व जिल्ह्यांना आणि विभागांना न्याय दिला जाईल. त्यामुळे ते दोघेही पूर्ण विचारविनिमय करून आधीसारखंच सर्वसमावेशक मंत्रिमंडळ बनवतील. त्यामुळेच बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत.”
रवी राणाही नाराज?
मंत्रिपदाच्या मुद्यावर रवी राणा म्हणाले कि, “मला मंत्रिपद मिळालं नसल्याने अमरावतीतील माता भगिनी नाराज आहेत. पण मला त्यांना सांगायचं आहे कि, तुम्ही निराश होण्याच काही कारण नाही. कारण आता फक्त अर्ध मंत्रिमंडळ स्थापण झालं आहे, अर्ध अजूनही बाकी आहे. मी गेल्या १० वर्षापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. ते लोकांचा विचार करणारे आणि लोकांमध्ये मिसळणारे नेते आहेत. त्यांचं अमरावतीकडे पूर्ण लक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे अमरावती जिल्ह्याला नक्कीच न्याय देतील.”
महत्वाच्या बातम्या :
- Navneet Rana | अमरावतीत सुरक्षा रक्षकांना बांधल्या नवनीत राणा यांनी राख्या
- Rakshabandhan । पोलीस भगिनीकडून राखी बांधून घेत शिंदे-फडणवीसांनी केले रक्षाबंधन साजरे
- Jayant Patil | भाजपाला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं – जयंत पाटील
- NCP VS BJP । राष्ट्रवादीची चिंता वाढणार; फडणवीस पुण्याचे पालकमंत्री, चंद्रकांत पाटलांचे संकेत
- Priyanka Chaturvedi | “पुढचे १० दिवस शिंदे गटासाठी चांदणी रात्र, पण त्यांनतर…”; प्रियंका चतुर्वेदी आक्र


