Share

संतप्त नागरिकांचा पाण्यासाठी अधिकाऱ्यांना घेराव

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्यासाठी नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील मयुर नगर-सुदर्शन नगर भागातील नागरिकांनी गुरुवारी (दि.२८) सकाळी विस्कळीत पाणीपुरवठ्याचा जाब विचारत मनपाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना तब्बल तीन तास धारेवर धरले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन समजूत घातल्यानंतर आश्वासन दिल्यानंतरच नागरिकांनी अधिकाऱ्यांची सुटका केली.

वॉर्ड क्रमांक २६ सुदर्शन नगर- मयुर नगर भागात गेल्या दिड महिन्यांपासून अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. तसेच पाण्याचीही वेळ कायम नाही. त्यामुळे लोक संतप्त झाले असून लोक भावनांचा उद्रेक झालेला यावेळी पाहायला मिळाला. अनेकदा तक्रारी करूनही समस्यांचे निराकरण प्रशासन करत नाही. पाणीपट्टी मात्र वर्षाची द्यावी लागते.

गुरुवारी (दि.२८) सकाळी ५ वाजता होणारा पाणीपुरवठा वेळेवर रद्द करत ११ वाजता करण्यात आला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी कनिष्ठ अभियंता गणेश मानकापे, गिरी तसेच प्लंबरसहित दोन कर्मचाऱ्यांना वेठीस धरले. आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत यांना जाऊ देणार नाही. अशी भूमिका नागरिकांनी घेतली. त्यानंतर अभियंता अशोक पद्मे यांनी येऊन नागरिकांना वेळेवर व ५ दिवसांआड पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचारी अधिकाऱ्यांना सोडण्यात आल्याची माहिती रहिवासी रमेश इधाटे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलतांना दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!