🕒 1 min read
पुणे : स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी आजाराशी लढणाऱ्या वेदिका शिंदे या चिमुकलीला 16 कोटी रुपयांच्या इंजेक्शनची आवश्यकता होती. ते इंजेक्शन आज देण्यात आलं आहे. ‘वेदिका फाइट्स एसएमए’ या वेदिकाच्या मदतीसाठी तयार करण्यात आलेल्या फेसबुक पेजवरून याबाबत माहिती देण्यात आली. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपाचर घेत असलेली वेदिका आता पूर्णपणे बरी असून, तिला उद्या हॉस्पिटलमधून सोडण्यातही येणार आहे.
तीरा कामत या मुलीच्या दुर्मिळ आजारावर उपचार यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रातील वेदिका शिंदे, ह्या पुण्यातल्या 11 महिन्यांच्या मुलीला एसएमए प्रकार- 1 असल्याचे निदान केले. हा एक दुर्मिळ जेनेटीक आजार असून 2 वर्षांच्या आधीच शिशुचे प्राण जाऊ शकतात. वेदिकाच्या बाबतीत निदान अतिशय लवकर होत असून आज तिला 16 कोटींचं इंजेक्शन देण्यात आलं आहे. इंजेक्शनचा डोस घेतल्यानंतर तिच्या आई-वडिलांना अत्यानंद झाल्याचं फोटोत दिसून येत आहे. मुलीसाठी जगभरातून झालेल्या मदतीने आणि प्रार्थनांनी आजचा दिवस उजाडला.
SMA -Type – 1 म्हणजे स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी. मज्जातंतूंशी निगडीत या दुर्मिळ आजारात मेंदूकडून स्नायूंना जाणारे संकेत मंदावतात आणि स्नायूंवर नियंत्रण रहात नाही वा स्नायूंना हालचाल करण्यासाठी बळकटी येत नाही. एका वेळेसचा जनुक बदलण्याचा उपचार असलेल्या झोलजेंस्माची किंमत 16 कोटी रूपयेआहे आणि मुलीला वाचवण्यासाठी ते आयात करणे भाग होते.
वेदिकाच्या पालकांनी त्यांची समस्या फंडरेझिंग माध्यम मिलापवर सांगितली आणि जगभरातील ऑनलाईन दात्यांना मदतीची विनवणी केली. मार्च महिन्यात सुरू झालेल्या ह्या फंडरेझर अभियानाला अतिशय मोठा प्रतिसाद मिळाला. तीन महिन्यांच्या आत एकूण 14.3 कोटी रूपये इतकी धनराशी मिलापच्या अभियानाला समर्थन करणाऱ्या दात्यांच्या सौजन्यामुळे उपलब्ध होऊ शकली.
सरकारी यंत्रणांकडून कर आणि आयात शुल्क माफ करण्यामध्ये पालकांना यश आले. डॉक्टरांनी आधीच एका प्रसिद्ध अमेरिकन फार्मासुटीकल कंपनीला झोलजेंस्मासाठी विनंती केली होती. या महिन्यात असेलल्या पहिल्या वाढदिवसाआधी वेदिकाने हे इंजेक्शन घेतले. वेदिकाला लागणारे जीन रिप्लेसमेंटचे झोलजेन्स्मा’ हे औषध दोन दिवसापूर्वीच रुग्णालयात अमेरिकेतून आले होते. ते आज वेदिकाला पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला देण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- NSDL च्या विधानानंतरही अदानींच्या शेअर्समधील घसरण काही केल्या थांबेना
- पुण्यात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ !
- …तर पुण्यात पुन्हा कडक निर्बंध; अजित पवारांची पुणेकरांना तंबी !
- अध्यक्षपदावरून हटवल्याने चिराग पासवान संतप्त, बंडखोर पाचही खासदारांना पक्षातून हाकलले
- ‘माझा यावर विश्वासच नाहीये की रामभक्त असे करू शकतात…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
