Share

आनंदवार्ता: गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील जीएसटी संकलनात २२ टक्क्यांची वाढ

Published On: 

नवी दिल्ली : सप्टेंबर २०२१ महिन्यात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करापोटी एकूण १,१७,०१० कोटी रुपये महसूल संकलित करण्यात आला आहे. त्यापैकी सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी २०,५७८ कोटी रुपये, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी २६,७६७ कोटी रुपये, आयजीएसटी ६०,९११ कोटी रुपये (यामध्ये वस्तूंच्या आयातीवरील करापोटी जमा झालेले २९,५५५ कोटी रुपये) आणि अधिभार ८,७५४ कोटी रुपये (यामध्ये वस्तूंच्या आयातीवरील करापोटी संकलित झालेले ६२३ कोटी रुपये) यांचा समावेश आहे.

सरकारने नियमित समझोता म्हणून आयजीएसटीमधून २८,८१२ कोटी रुपये सीजीएसटीला आणि २४,१४० कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. सर्व देणी दिल्यानंतर, सप्टेंबर २०२१ या महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारांना सीजीएसटीपोटी ४९,३९० कोटी रुपये आणि एसजीएसटीपोटी ५०,९०७ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे.
गेल्या वर्षीच्या याच महिन्यात संकलित झालेल्या जीएसटी महसुलापेक्षा सप्टेंबर मध्ये २३% अधिक महसूल गोळा झाला आहे. या महिन्यात आयात केलेल्या वस्तूंवरील करापोटी ३०% अधिक महसूल जमा झाला असून देशांतर्गत व्यवहारांमधून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल याच स्त्रोतांद्वारे गेल्या वर्षी याच महिन्यात संकलित महसुलापेक्षा २०% अधिक राहिला. सप्टेंबर २०१९ मध्ये संकलित ९१,९१६ कोटी रुपयांचा महसूल लक्षात घेतला तर यावर्षीचे महसूल संकलन गेल्या वर्षीपेक्षा ४% नी जास्त आहे.

विद्यमान वर्षातील दुसऱ्या तिमाहीत एकूण मासिक सरासरी जीएसटी संकलन १.१५ लाख कोटी रुपये झाले आहे आणि हे या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत संकलित झालेल्या १.१० लाख कोटी रुपयांच्या एकूण मासिक सरासरी संकलनाहून ५% अधिक आहे. अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याचे हे स्पष्ट निदर्शक आहे. आर्थिक विकासासोबतच, कर चुकवेगिरी करणाऱ्यांच्या विरोधातील कारवाई, विशेषतः बनावट बिले तयार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईने देखील जीएसटी महसूल संकलन वाढविण्यात योगदान दिले. आगामी महिन्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जीएसटी महसूल संकलन होण्याचा कल कायम राहील आणि या वर्षीच्या उर्वरित सहा महिन्यांमध्ये याहून अधिक जीएसटी महसूल संकलन होईल अशी अपेक्षा आहे.

राज्यांच्या जीएसटी महसुल संकलनात येणारी तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांसाठी २२,००० कोटी रुपयांची जीएसटी भरपाई देखील दिली आहे. सप्टेंबर २०२० महिन्यामध्ये महाराष्ट्रात १३,५४६ कोटी रुपये जीएसटी महसूल संकलन झाले होते, तर सप्टेंबर २०२१ मध्ये १६,५८४ कोटी रुपये जीएसटी महसुलाचे संकलन झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या जीएसटी महसूल संकलनात २२% ची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!