Share

अज्ञात वाहनाने दिली  पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Published On: 

औरंंगाबाद : भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. तेजस महादेव शिरसाट (वय ३६,रा.एकतानगर,जटवाडा रोड, हर्सुल) असे अपघातात जखमी होवून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस शिरसाट हा युवक १५ जून रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आझाद चौकातून पायी जात होता. त्यावेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने तेजस शिरसाट याला जोराची धडक दिली. अपघातानंतर वाहनचालकाने वाहनासह घटनास्थळावरून धुम ठोकली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तेजस शिरसाट याला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना तेजस शिरसाट याचा मृत्यू झाला.

तेजस शिरसाट यांचे नातेवाईक ईशांत मोतीलाल नरवडे (रा.जटवाडा रोड, हर्सुल) यांनी दिलेल्या तक्रारीवरून धडक देणाऱ्या वाहनधारकांविरूध्द जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!