Share

जाधववाडीत अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या

Published On: 

औरंगाबाद : जाधववाडी मध्ये बाजारसमितीच्या इमारतीवर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना शुक्रवारी दि. २१ रोजी पहाटे उघडकीस आली. रात्रीच्या वेळी वादातून अज्ञातांनी दगडाने ठेचून अनोळखी व्यक्तीची हत्या केली असल्याचा प्रार्थमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

बाजारसमितीच्या इमारतीवर अंदाजे ४० ते ४५ वर्षाच्या इसमाचा मृतदेह असल्याची माहिती तिथेच बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना स्थानिक मजुरांनी दिली. या वरून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आणि घटनेची पाहणी करण्यास सुरुवात केली. या दरम्यान घटनास्थळी पोलिसांना रक्ताने माखलेला दगड आढळून आला. यावरून पोलिसांनी अनोळखी इसमाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रार्थमिक अंदाज व्यक्त करत श्वान पथकासह फोरेन्सिक पथकाला पाचरण केले.

श्वानाला दगडाचा वास दिल्यानंतर श्वान जाधववाडीत असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पर्यंत जात तिथेच घुटमळले. अनोळखी इसमाच्या मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी घाटीत रवाना करण्यात आले. आरोपींचा शोध तसेच अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याची माहिती पो नि अशोक गिरी यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!