Share

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर फुलंब्रीत मोफत धान्य वाटपास सुरुवात!

Published On: 

फुलंब्री : संचारबंदीच्या काळात मोफत धान्य देण्याची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार पुरवठा विभागाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. गावस्तरावर प्रत्यक्ष धान्य वितरणाला सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत तालुक्यातील एक लाख २६ हजार ३८७ लाभार्थ्यांना धान्याचे वितरण मोफत करण्यात असल्यामुळे संकट काळात खुप मोठा आधार मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदीचा निर्णय घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोफत धान्य वितरणाची घोषणा केली होती. या घोषणेची पुर्तता फुलंब्री तालुक्यात होतांना दिसत आहे.

तालुक्यात एकुण २४ हजार ९३८ कार्डधारक आहेत. एक लाख २६ हजार ३८७ सदस्यांची संख्या आहे. संचारबंदी जाहीर करण्यापूर्वी मोफत धान्य वितरण करण्याचे घोषीत करण्यात आले होते. त्यानूसार तालुका पुरवठा विभागाच्यावतीने वितरणाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात आली आहे. कुटुंबातील प्रति लाभार्थ्यांना ३ किलो गहू व २ किलो तांदूळ वितरित होणार आहे. तालुक्यातील १११ रेशन दुकानांपैकी मंगळवारपर्यंत ६८ रेशन दुकानावर धान्य पुरवठा करण्यात आला आहे.

उर्वरित ४३ राशन दुकानावर शनिवार (दि. १५) पर्यंत धान्य वितरित होईल. अशी माहिती पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार प्रशांत काळे यांनी दिली आहे. फुलंब्री तालुक्यात अन्तोदय योजनेच्या लार्भार्थ्यांसाठी ५५० क्विंटल गहू तर २५० क्विंटल तांदूळ तर प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांसाठी ३ हजार ४९० क्विंटल गहू आणि २ हजार ३२० क्विंटल तांदूळ मंजूर करण्यात आले होते. त्यानूसार गावस्तरावरील दुकानात वाटप करण्यासाठी धान्य पुरवठा करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!