गोंदिया : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाली आहे. मात्र या संकटाचा सामना जिल्ह्यातील यंत्रणेने सक्षमपणे केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीत आता सुधारणा झाली आहे. या संकटाचा सामना करीत असताना यंत्रणेच्या काही त्रुटी आणि चुका राहिल्या असतीलही, मात्र ही चुका काढण्याची किंवा टिका करण्याची वेळ नाही. तर आलेल्या संकटाशी सर्वांनी मिळून लढण्याची वेळ आहे. कोविडच्या लढ्यात यंत्रणा चांगले काम करीत असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. ऑक्सिजन, औषधे आणि बेडचीसुध्दा समस्या नाही. जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटर मध्ये पुन्हा १०० ऑक्सिजनयुक्त बेड वाढविण्यात येतील. तसेच देवरी, आमगाव, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात लवकरच ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट उभारण्यात येणार आहे. तर गोंदिया येथे पुन्हा एक ऑक्सिजन सिलिंडर रिफिलींग प्लांट उभारण्यात येणार आहे.’ असे यावेळी त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- सध्या अशोक चव्हाणांची अवस्था तलाठ्याचा कोतवाल झाल्यासारखी आहे – सदाभाऊ खोत
- कोरोना नंतर म्युकरमायकोसीस आजार; प्रत्येक रुग्णाचा जीव वाचवण्याचा दृष्टीकोन हवा- आ. निलंगेकर
- मान्सूनपूर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!
- चक्रीवादळाचे रौद्ररूप : केरळातील अनेक घरे जमीनदोस्त, कोकणात समुद्र खवळला
- ‘म्युकरमायकोसिस’चा लातुरात शिरकाव; ५ रुग्ण आढळले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

