Share

लखीमपूर हिसांचाराच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन

Published On: 

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज देशभरात ठिकठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन सुरु आहे. पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिद्धू यांना पोलिसांनी चंदीगडमधून आंदोलन करताना ताब्यात घेतले आहे. मुंबईमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु आहे.

नाना पटोले, काँग्रेस नेते आणि राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आंदोलनापूर्वी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये सचिन पायलट यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसकडून लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले आहे.

पंजाब-चंदिगढमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. यात काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू सहभागी झाले आहेत. शांततेने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गाड्या चालवणाऱ्यांना अटक करायला हवी आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. दरम्यान, लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या घटनेनंतर त्या ठिकाणी भेट देणाऱ्या अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलनावेळी हिंसाचाराची घटना घडली. यात चार शेतकऱ्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे तिकोना भवानीपूर दौऱ्यावर असताना ही घटना घडली. त्यानंतर बिगर भाजपाशासित राज्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर विरोधकांनी या प्रकरणी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!