Share

“तुम्ही हे विसरून जा, की मी देवेंद्र फडणवीसांची बायको आहे” – अमृता फडणवीस

Published On: 

मुंबई: ‘मला जे काही दिसतं मी त्याबद्दल बोलत असते. मला खड्डे, वाहतूक कोंडीचा किती त्रास होतो, हे मला माहित आहे. मी एका सामान्य स्त्रीसारखी बाहेर निघते. मी जे काही बोलते ते एक सामान्य नागरिक म्हणून बोलते. त्यामुळे तुम्ही हे विसरून जा की मी देवेंद्र फडणवीसांची बायको आहे. मानसिक संतुलन गेलाय, अशी भाषा करणे योग्य नाही. आज मुंबईत वाहतूक कोंडीमुळे ३ टक्के घटस्फोट होतात, कारण की लोकांना घरी वेळ देता येत नाही, हे सर्व बंद झाल पाहिजे. त्यासाठी बोलले पाहिजे.’ असे वक्तव्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बायको अमृता फडणवीस यांनी केले आहे. त्या मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या.

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी अमृता फडणवीस मानसिक संतुलन बिघडल आहे, अशी टीका केली होती. अमृता फडणवीस यांनी त्याला उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (NCP leader Rupali Patil Thombre)  म्हणाल्या होत्या की, ‘आवरा वहिनी स्वतःला, जर भाऊ आवरत नसेल तर तुम्हीच तुमचं स्वतःला आवरा अन्यथा मानसिक संतुलन बिघडले म्हणून तुम्हाला उपचार घ्यावे लागतील’. अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट केलं होत त्याला प्रतिक्रिया म्हणून रुपाली पाटील ठोंबरे हे वक्तव्य केले होते.

अमृता फडणवीस यांनी ३० जानेवारीला ट्वीट करून नाव न घेता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut), राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्या ट्वीटमध्ये म्हणाल्या होत्या, ‘थोडक्यात उत्तर द्यावे…५० मार्क्स, नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हें पटोले… या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात? तसेच रिक्त स्थानाची पूर्ती करा…५० मार्क्स, _____शराब नही होती! हरामख़ोर का मतलब _____है और सुनने में आया है _____नामर्द है!’

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!