🕒 1 min read
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात ते आपल्या गाण्यांमुळे ! त्यांच्या काही वक्तव्यांमुळे देखील त्या अनेकदा चर्चेत आल्या आहेत. याचमुळे त्यांना अनेकदा ट्रोल देखील केलं गेलं आहे. मात्र, ट्रोलर्सना भाव न देता त्यांनी आपली कला जोपासणार असल्याचं वेळोवेळी सांगितलं आहे.
आता त्यांनी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ८ मार्च रोजी आपलं नवं गाणं प्रदर्शित केलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. नाट्य संगीतावर आधारित ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ असे या गाण्याचे बोल आहेत. ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…हे माझे नाट्य संगीतावर आधारित गीत सादर करते, आज जागतिक महिला दिनी फक्त तुमच्या साठी !’ असं ट्विट करत हे प्रेरणादायी गीत ऐकण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हे गाणे ऐकल्यानंतर ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांना मिळालेल्या संधीचा योग्य फायदा उठवला, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण @fadnavis_amruta ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा! असे त्यांनी या ट्वीट मध्ये म्हटले आहे.
काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण @fadnavis_amruta ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा! https://t.co/aPiF9xBMWL
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 9, 2021
दरम्यान, या गाण्यात एका लहान मुलीच्या कलेच्या आवडीची व त्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाची मांडणी करण्यात आली आहे. तर, या गाण्यातून त्यांनी ट्रॉलर्सला देखील एकप्रकारे इशारा दिला आहे. सातत्याने ट्रॉलर्सना महिला दिनी चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ‘माझं आणखी एक गाणं येतंय, मी ट्रोलर्सना या गाण्यातून उत्तर देईन,’ असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
- मंत्र्यांवर आरोपांची सरबत्ती, मात्र फडणवीस सरकारच्या तुलनेत ठाकरे सरकारच्या काळात महिला अत्याचारात घट !
- विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच, ‘या’ नेत्याचे नाव निश्चित ?
- अजितदादांनी अर्थसंकल्पातून महिलांबाबत केलेल्या घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक ?
- ‘१७ वर्षांपासूनच्या लढ्याला यश मिळाले’ अर्थसंकल्पानंतर शिवाजीराव आढळराव पाटीलांची प्रतिक्रिया
- ‘त्या’ निनावी फोनने वाचले दोघींचे आयुष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
