🕒 1 min read
औरंगाबाद : अधिवेशनात राष्ट्रवादी युवकचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याचे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांवर सरकार दबाव आणत आहे. पोलीस देखील या प्रकरणाचे सोक्ष मोक्ष लावण्यात अद्याप अपयशी ठरले आहे. सत्ताधरी हे प्रकरण दाबत असून सत्ताधाऱ्यांना सौ गुन्हे माफ असल्याची प्रतिक्रिया भाजप महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा अमृता पालोदकर यांनी दिली.
सत्ताधारी पक्षात काहीही चालू शकत, याच जिवंत उदाहरण म्हणजे मेहबूब शेख, धनंजय मुडे, संजय राठोड हे आहेत. सत्तेत बसल्यावर काहीही घडवता येत. सत्ताधारी म्हणून माफ देखील करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. पोलिसांची इच्छा असून देखील पोलिसांवर दबाव टाकून त्यांना देखील काम करण्यापासून हे सरकार रोखत असल्याचे पालोदकर यांनी सांगितले.
दरम्यान, मेहबूब शेख यांच्यावर झालेल्या आरोपावरूनही फडणवीसांनी निशाणा साधला. मेहबूब शेख केवळ राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून कारवाई करण्यात आली नाही. स्वतः डीसीपी बचावासाठी पुढे आले. इतका पोलिसांवर दबाव आहे. सत्ताधारी पक्षाला वेगळा न्याय आणि जनतेसाठी दुसरा न्याय, असेच चालणार असेल तर कशाला हवा शक्ती कायदा, असा खरमरीत सवालच देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात विचारला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- …म्हणून इच्छा असूनही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट होऊ शकली नाही
- मिटकरी भावा तू आता आला,माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार
- महाविकास आघाडी नव्हे, हे तर निजामी सरकार-संभाजी पाटील निलंगेकर
- राज्य सरकार डॉक्टरांचा सल्ला घेतंय की कंपाऊंडरचा ? फडणवीस कडाडले
- माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची ‘बैलगाडी’ रोखली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
