🕒 1 min read
मुंबई : नुकतेच वाईन विक्रीवरून ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर(Bandatatya Karadkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule), भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankja Munde) यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले बघायला मिळाले. तसेच बंडातात्या यांचे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(RSS)आणि भाजपला बळ देणारे असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadanvis)यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.
यावेळी बोलत असतांना अमृता म्हणाल्या की,‘भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे पुरोगामी विचारांचे आहेत. स्त्रियांचा मान ठेवणं हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे आणि ते हे पार पडतात. मी नॉन पॉलिटिकल व्यक्ती आहे. पण भाजप आणि संघाच्या जवळ आहे. त्यामुळे मी एकच सांगू इच्छिते की स्त्रीचा जर कोणी सर्वात जास्त आदर करत असेल तर ते फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
दरम्यान, पुढे महाविकास आघाडीतील स्त्रियांवर काही अन्याय झाला तर महिला आयोगाकडून तात्काळ दखल घेतली जाते परंतु भाजपमधील महिलांवर अन्याय झाला तर नाही याविषयी विचारण्यात आले असता त्या म्हणाल्या की,‘महावसुली सरकारची कामे तशीच चालू आहेत. हे बायस सरकार आहे. या सरकारमध्ये एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय दिला जातो. खरं तर हे सरकारमधील अवगुण आहेत’, असे अमृता म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:
-
“महिलांवर टिपणी करणे चुकीचे…”, अमृता फणडवीसांचा बंडातात्यांना सल्ला
-
“१०० कोटींच्या खंडणीत या बदल्यांचा हिस्सा किती होता तेही सीताराम कुटेंनी सांगावं”
-
वादग्रस्त वक्तव्यानंतर किर्तनकार बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात
-
गोत्यात आल्यावर फोडले पत्रकारांवर खापर! बंड्यातात्याची वादग्रस्त मालिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
