मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिध्द असलेली अभिनेत्री कंगना रणौत (Actress Kangana Ranaut) ही कायच चर्चेत असते. चित्रपटासह,सामाजिक विषयावर बिनधास्तपणे वक्तव्य करत असते. मात्र कगंना लवकरच एक रिअॅलिटी शो होस्ट करणार असून त्याविषयी बोलताना चक्क बॉलिवूडच्या (Bollywood) भाईजानवर निशाणा साधला आहे.
दरम्यान कंगना रणौत सोशल मीडियावर चर्चेत असते. आता कंगना एका शोच्या सुत्रसंचालन करणार आहे. ती एकता कपूरसोबत (Ekta Kapoor) दिसणार असून या शोचे ‘लॉकअप’ (‘Lockup’) असं नाव आहे. या शोमध्ये १६ स्पर्धक हे ७२ दिवसांसाठी लॉकअपमध्ये बंद राहणार आहेत. कंगना हा शो होस्ट करणार आहे. तसेच अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये जेलमध्ये राहताना दिसणार आहेत.
विशेष म्हणजे ‘लॉकअप’ या शोच्या माध्यमातून कंगना रणौत ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) पदार्पण करत आहे. या शोविषयी बोलताना बॉलिवूडचा भाईजान तसेच ‘बिग बॉस’ होस्ट सलमान खानवर (Bigg Boss’ host Salman Khan) निशाणा साधला आहे. ‘हे तुमच्या भाईचे घर नाही. तर माझे जेल आहे. माझ्याकडे प्रत्येक स्पर्धकाची फाइल आहे आणि त्यांचे सत्य त्यामध्ये आहे’ असं कंगनाने म्हटले आहे.
तसेच कंगना म्हणाली, ‘मी गेल्या काही दिवसांपासून ओटीटीसाठी काही करावे असा विचार करत होते. पण या शो विषयी नेमकं काय करावे हे मी काही ठरवले नव्हते. जेव्हा मला एकता कपूरचा फोन आला आणि तिने मला याबाबत माहिती दिली तेव्हा मला तो खूप आवडला. त्यानंतर तो मी करण्याचा निर्णय घेतला.’ आता लवकरच तिच्या सुत्रसंचालनाने सज्ज असलेला शो चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरतो आहे.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

