मुंबई : अमरावती जिल्ह्यातील गांधी नगर येथील लव्ह जिहाद प्रकरणावर खासदार नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जोरदार राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस स्टेशनमध्ये नवनीत राणा यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली होती. याच पार्श्वभूमीवर आता पोलीस कर्मचार्याची पत्नी असलेल्या वर्षा भोयर यांनी नवनीत राणांना सज्जड दम भरलाय तसेच नवनीत राणांना आता सोडणार नसल्याचा ईशाराही दिला आहे.
वर्षा भोयर यांचा नवनीत राणांना सज्जड दमः
नवनीत राणा तुला मी आता सोडणार नाही, अशी थेट धमकी वर्षा भोयरांनी नवनीत राणांना दिली आहे.
काय आहे प्रकरण?:
अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गांधी नगर येथील एका हिंदू 19 वर्षे तरुणीचे अपहरण केले. मुलीने केलेल्या चॅटिंग वरून पोलिसांनी सोहेल शहा या संशयित आरोपीला राजापेठ पोलीस ठाण्यात आणले आहे. मात्र, अजूनही मुलीचा शोध न लागल्याने भारतीय जनता पक्ष विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते आक्रमक होत पोलीस ठाण्यात दाखल झाले.
मनीष ठाकरे व पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्यावर नवनीत राणा चांगल्याच भडकल्या, मी मागासवर्गीय असल्याने माझा कॉल रेकॉर्ड केला असा आरोप करत ठाणेदार मनीष ठाकरे यांचा फोन हिसकावून घेतला. त्यावेळी पोलीस व नवनीत राणा यांच्यामध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला.
दरम्यान, आमच्याकडे असे काही विषय येत असले आणि जर आम्ही तुम्हाला फोन करत असताना फोन रेकॉर्ड होत असेल. मी तुम्हाला सांगते. मी फोन केला तेव्हा माझा संपूर्ण फोन कॉल रेकॉर्ड केला आहे, असं म्हणत नवनीत राणा यांनी पोलिसांना धारेवर धरलं.
महत्वाच्या बातम्याः
- Congress vs Bjp | राहुल गांधींनी घातला 41 हजारांचा टी-शर्ट! भाजपच्या आरोपांना काँग्रेसचं उत्तर! म्हणाले, “मोदींचा सूट…”
- Mohit Kamboj |”गणेशोत्सव,दहीहंडीच्या शुभेच्छाही द्यायला विसरले”; भाजपच्या ‘या’ नेत्याचा ठाकरेंवर निशाणा
- Sunil Raut | संजय राऊतांच्या जामीनीसाठी भाऊ सुनील राऊत धावले! मातोश्रीवरुन थेट दिल्लीला
- Mohit Kamboj | याकूब कबरीप्रकरणावरून मोहित कंबोज यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लबोल
- Devendra Fadnavis | “आमच्या सरकारमध्ये हिंमत होती…” ; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

