मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी नेत्यांकडून विरोधी पक्षनेत्यांवर सतत आरोप केले जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर गेले दोन वर्ष कोरोनामुळे कोणतेच सण साजरे करता आले नाही. परंतू यावर्षी निर्बंधमुक्त सण साजरे करता आहे. यावरून सत्ताधाऱ्यांनी शिवसेना पक्षाला टार्गेट केलं आहे. अशातच भाजप नेते मोहित कंबोज यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मोहित कंबोज काय म्हणाले?
2 कोटी जनतेला अडीच वर्षांत सण साजरे करता आले नाहीत, ते गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या शुभेच्छा द्यायलाही विसरले, असं म्हणत मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे. तसेच, मोहित कंबोज यांनी मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते की, भाजप आणि शिंदे यांचं सरकार महाराष्ट्रात आल्यामुळेच जनतेला निर्बंधमुक्त सण साजरा करता येत असल्याचा. असा दावाही त्यांनी केला आहे.
श्री उद्धव ठाकरे @OfficeofUT जी ने इस साल 12 Crore महाराष्ट्र के लोगों को ना ही गणेशोत्सव की बधाई दी ना ही दही हांडी उत्सव की !
2.5 साल के बाद हिन्दुओं ने जो उत्साह से दोनो त्योहार मनाया हैं उसके लिए @mieknathshinde जी और @Dev_Fadnavis जी को दिल से धन्यवाद !
हर हर महादेव !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) September 10, 2022
मोहित कंबोज यांनी याकूब मेमन कबरीप्रकरणावरूनही उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह आणि ट्विटरच्या माध्यमातून खूप उत्तर देतात. त्यामुळे त्यांनी याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण का केलं?. त्याच्या मागे नेमका काय उद्देश होता? याची उत्तरही जनतेला दसऱ्याच्या आधी द्यावीत, असं म्हणत मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान केलं आहे.
पुढे ते असंही म्हणाले की,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतवृत्वाखाली महाराष्ट्रात सुशासन परत आलं आहे. दोन वर्षे हिंदू सणांवर आक्रमण करण्याचं काम झालं. जे हिंदू होते ते कधी पुरोगामी झाले कळालं नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Mohit Kamboj | याकूबच्या कबरीप्रकरणावरून मोहित कंबोज यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लबोल
- Devendra Fadnavis | “आमच्या सरकारमध्ये हिंमत होती…” ; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- BJP | मुंबईमध्ये लालबागच्या राज्याचं विसर्जन करताना भाजप कार्यकर्तांमध्ये तुफान राडा
- Devendra Fadnavis | “मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांना कोण कोण संरक्षण देतं हे आम्ही पाहिलं आहे”
- Girish Mahajan | “पान टपरीवाल्याला गोधडी दाखवणार”; म्हणणाऱ्या चंद्रकांत खैरेंवर गिरीश महाजनांचा हल्लाबोल


