Share

Mohit Kamboj | याकूब कबरीप्रकरणावरून मोहित कंबोज यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लबोल

Published On: 

मुंबई : दोन दिवसांपूर्वी 1993 साली मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीची सजावट केलेला फोटो व्हायरल होत होता. त्यानंतर एक माहिती समोर आली ती म्हणजे दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते आणि फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आल्याचं दिसून येतं आहे. राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, यामुद्यावरून भाजप पक्षाचे नेते शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत आहेत. अशातच भाजपा नेते मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे यांना एक आव्हान दिलं आहे.

काय म्हणाले मोहित कंबोज?

उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह आणि ट्विटरच्या माध्यमातून खूप उत्तर देतात. त्यामुळे त्यांनी याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण का केलं?. त्याच्या मागे नेमका काय उद्देश होता? याची उत्तरही जनतेला दसऱ्याच्या आधी द्यावीत, असं म्हणत मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान केलं आहे. मोहित कंबोज यांनी मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी बोलत होते.

पुढे ते असंही म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतवृत्वाखाली महाराष्ट्रात सुशासन परत आलं आहे. दोन वर्षे हिंदू सणांवर आक्रमण करण्याचं काम झालं. जे हिंदू होते ते कधी पुरोगामी झाले कळालं नाही.

दरम्यान, याकूब मेमनच्या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांना कोण कोण संरक्षण देतं हे आम्ही पाहिलं आहे. त्यांचे साथीदार अजूनही जेलमध्ये बसले आहेत, ज्यांना मंत्री बनवलं गेलं

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!