Share

Sunil Raut | संजय राऊतांच्या जामीनीसाठी भाऊ सुनील राऊत धावले! मातोश्रीवरुन थेट दिल्लीला

Published On: 

मुंबई : 1 ऑगस्ट रोजी 2022 रोजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीने अटक केली होती. राऊत यांच्या विक्रोळी येथील निवास्थानी ईडीने धाड टाकली तेव्हा तब्बल साडे नऊ तास चौकशी आणि ईडीच्या कार्यालयात सात तासांहून अधिक काळ संजय राऊत यांची चौकशी झाली. तब्बल 15 तांसाहून अधिक काळ ईडीकडून संजय राऊतांची चौकशी सुरु होती. यानंतर अखेरीस 1 ऑगस्ट रोजी साडे बाराच्या सुमारास ईडीने त्यांना अटक केली. त्यानंतर अनेक वेळा जामीन अर्ज केला. मात्र, त्यावर दिलास न मिळाल्याने आता राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांनी धाव घेतली आहे.

सुनील राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली:

सुनील राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. संजय राऊत यांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्यात आलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असले तरी ते आता माझ्या राऊत कुटुंबाचे देखील प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी मला भेटालया बोलावलं होतं, त्यांनी कुटुंबाची विचारपूस केली असं सुनील राऊत यांनी सांगीतलं आहे.

मातोश्रीवरुन थेट दिल्लीलाः

दरम्यान, सजंय राऊत यांच्या जामिनासाठी अर्ज केलेला असून मला खात्री आहे की संजय राऊत यांच्यावर कुठलाही गुन्हा नसल्याने त्यांना लवकरात लवकर जामीन मिळेल असा विश्वास सुनील राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर व्यक्त केला. यानंतर आता ते थेट दिल्लीला पोहचले आहेत. वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा करण्यासाठी सुनील राऊत दिल्लीत पोहोचले आहेत.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!