🕒 1 min read
मुंबई : काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यासोबत 12 आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या माहितीमुळे महाराष्ट्र राज्यातील राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ उडाली असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच याच मुद्यावर शिवसेना पक्षाचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया-
काँग्रेसचेही नऊ आमदार फुटणार?,असा सवाल आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला असता, जाऊ दे ना, आपण आत्ता जर-तर, अगर-मगरपेक्षा देवाचं दर्शन घेऊ आणि त्या आशीर्वादाने पुढे जाऊ, असं ते म्हणाले आहेत. आज आदित्य ठाकरे चंदनवाडीच्या गणपतीच्या दर्शनाला गेले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उत्सवाच्या दिवशी मी राजकारणावर बोलत नाही-
तसेच,मी उत्सवाच्या दिवशी मी राजकारणावर बोलत नाही. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे त्यावर काहीही बोलणार नाही. पत्रकारांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दोन महिने झाले आहेत. या सरकारला किती गुण द्याल? असा सवाल विचारला असता त्यावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.
नाहीतर लोकांना राजकारणाचा कंटाळा येईल-
पुढे ते असंही म्हणाले की, उत्सवाच्या काळात जो कुणी राजकारण करत असेल तो बालिशपणा आहे. लोकांना हे सगळं दिसत आहे. एवढं राजकारण झालं तर लोकांना राजकारणाचा कंटाळा येईल. कोविडच्या दोन वर्षांच्या काळानंतर आता सणवारांचा आनंद घेत आहेत. त्यामुळे राजकारण बाजूला ठेऊन लोकांना याचा आनंद घेऊ द्यावा.
महत्वाच्या बातम्या :
- Prashant Bamb | “5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त मी स्वत: …”; प्रशांत बंब यांचे माध्यमांसमोर विधान
- Nitin Gadkari | नितीन गडकरींनी पुण्यातील चांदणी चौकात होणाऱ्या गर्दीवर रचला जबरदस्त प्लॅन
- PAK vs HK | पाकिस्तान विरुद्ध हॉककाँग आज सामना, ‘करो या मरो’ची परिस्थिती
- Ambadas Danve | शाळेत दाखला अन् मुले शिक्षणासाठी मदरशात ; अंबादास दानवे यांनी घेतली दखल
- Ajit Pawar | एकनाथ शिंदे चूक की बरोबर, जनताच ठरवेल- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
