🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय लाजिरवाना प्रकार घडला आहे. विधान भवनाच्या बाहेर विरोधक यांनी खोक्यांचा नारा लावला होता. हा नारा मागे देखील लावण्यात आला होता. मात्र यावेळी ’50 खोके एकदम ओके’ हा नारा सत्ताधारी मंडळींना जास्तच झोंबला असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते आमने सामने आले. याच पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गट आणि राज्य सरकारवर आरोप केला आहे.
सत्ताधाऱ्यांच्या दादागिरीचा प्रकार आहे-
विधानभवनातील पायऱ्यांवर आमदारांमध्ये झालेली धक्काबुक्की हा सत्ताधाऱ्यांच्या दादागिरीचा प्रकार आहे, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारवर आरोप केला आहे. धक्काबुक्कीनंतर अमोर मिटकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमच्यासारख्या नवीन आमदारांवर अशाप्रकारची दादागिरी योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
शिंदे नावाच्या आमदाराने धक्का-बुक्की करायला सुरूवात केली –
तसेच, धक्काबुक्की होताना शिंदे गटातील आमदारने आम्हाला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली, असा आरोप अमोल मिटकरी यांनी शिंदे गटावर केला आहे. काल महाविकास आघाडीची बैठकी झाली. त्यामध्ये चर्चा झाली की शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे ओल्या दुष्काळाची मागणी करायची म्हणून आम्ही साडेदहाला विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमायचं ठरवलं होतं. मात्र सत्ताधारी आमच्या आधी तिथे पोचले आणि आंदोलन करायला सुरुवात केली. आम्ही आंदोलन शांततेत करत होतो. मात्र शिंदे गटातील शिंदे नावाच्या आमदाराने धक्का-बुक्की करायला सुरूवात केली असल्याचं मिटकरींनी सांगितलं.
दरम्यान, घडलेला प्रकार महाराष्ट्र राज्याला शोभणारा नव्हाता. त्यामुळे अमोल मिटकरी यांनी केलेल्या आरोपांवर सत्ताधारी पक्षनेते काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | पोलीस भरती कधी करणार? ; अजित पवार यांचा सरकारला प्रश्न
- Ajit Pawar | “आम्ही सत्तेत असताना विरोधकांना कधी अडवलं नाही, मात्र शिंदे गट…” ; अजित पवारांची प्रतिक्रिया
- Amol Mitkari | “आमच्या आई-बहिणीवर शिव्या दिल्या”; अमोल मिटकरी यांचा शिंदे गटावर आरोप
- Eknath Shinde | थांबवा आता शब्दांचे वार, आमचे मित्र अजित पवार- एकनाथ शिंदे
- 50 खोक्यांवरुन सत्ताधारी – विरोधक यांच्यामध्ये धक्काबुक्की, अश्लील शिव्यांसह केला राडा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
