Share

…यावरून ‘या’ विकृतींना त्यांनी मुक समर्थन दिल्याचे दिसते- अमोल मिटकरी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj)मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली आहे. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याने राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर याअगोदर चंद्रकांत पाटील यांनीही शिवरायांची तुलना मोदींशी करत वादग्रस्त वक्तव्य केले होते. याचाच संदर्भ देत राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होट बँक तयार केली व नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला’ असे म्हणणारे हिंदूंचे देशातील एकमेव नेते आज कर्नाटक मध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर मूग गिळून गप्प बसले आहेत.यावरून या विकृतींना त्यांनी मुक समर्थन दिले असे दिसते. असे ट्वीट करत अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील यांचे ‘ते’ वक्तव्य-

एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी पंतप्रधान मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी (Chhatrapati Shivaji Mahara)केली. वर्षानुवर्ष मेहनत घेऊन विकसित केलेली जी रोपवे आहेत, ती संत-महंता पर्यंत पोहचते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत पोहचते. त्यांनीही हिंदुत्वाची व्होट बॅंक तयार केली. त्यात अलीकडच्या काळामध्ये अटलजी, अडवाणी आणि मोदी यांनी कळस चढविला. असे विधान केले होते.

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर काही अज्ञातांकडून क्रांतीवीर संगोळी रायण्णा (revolutionary Sangoli Rayanna) यांच्या पुतळ्याचीही विटंबना झाल्याची माहिती समोर येत आहे. क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या गळ्याभोवती लाल-पिवळा झेंडा गुंडाळला असून हात कापडाने बांधले आहेत. यानंतर सदाशिनगर बंगळूर येथे शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे याभागात तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी मध्यरात्रीपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. तर खबरदारी म्हणून शहर आणि तालुक्यात कलम १४४ जारी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!