मुंबई : 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आज महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडणुकीच्या मैदानात नव्हता. मात्र तरीही भाजपचे नेते निलेश राणे यांनी आज जाहीर झालेल्या निकालावरुन शरद पवारांवर टीका केली आहे.
2 दिवस उशिरा का होईना, पवार साहेबांना वाढदिवसाचे गिफ्ट मिळाले. विधान परिषदेत राष्ट्रवादीला 0 जागा निवडणून आलेल्या भाजपच्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन, असे ट्विट करत निलेश राणेंनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर जहरी टीका केली आहे.
मुंबईत काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या सुरेश कोपरकरांनी माघार घेतल्याने भाजपचे राजहंस सिंग हे बिनविरोध विधान परिषदेत जाणार आहेत. धुळे-नंदुरबारमध्ये भाजपकडून माजी मंत्री अमरिश पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या गौरव वाणी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, वाणी यांनी अर्ज मागे घेतला आणि ही जागा बिनविरोध भाजपच्या पारड्यात पडली.
तसेच सहापैकी चार जागा बिनविरोध निवडून गेल्या होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला आहे. निलेश राणे यांनी शिवसेनेलाही या निकालावरुन टीकेचे लक्ष्य केले आहे.
दोन दिवस उशिरा का होईना पवार साहेबांना वाढदिवसाचं गिफ्ट मिळालं.
विधानपरिषद राष्ट्रवादी – 0 जागा
निवडून आलेल्या सगळ्या BJP उमेदवारांचे अभिनंदन.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 14, 2021
बहुमत असून पण शिवसेना उमेदवाराचा दारूण पराभव झाला. मित्रपक्षांनी दगा दिला आणि म्हणे 25 वर्षे आम्ही युतीमध्ये सडलो. कोण कोणाला सडवतोय आता उद्धव ठाकरेंना कळाले असेल, असे निलेश राणे म्हणाले आहेत.
अकोला विधानपरिषद निवडणुक…
बहुमत असून पण शिवसेना उमेदवाराचा दारूण पराभव. मित्रपक्षांनी दगा दिला आणि म्हणे २५ वर्षे आम्ही युती मध्ये सडलो. कोण कोणाला सडवतोय आता उद्धव ठाकरेंना कळलं असेल.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 14, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘अकोल्यात विश्वासाला तडा, पण कोण्या एका पक्षाला दोष देऊन चालणार नाही’
- राज ठाकरेंनी सांगितला एसटी संपावर ‘हा’ उपाय
- कामं आम्ही करायची आणि मत मात्र दुसऱ्याला; राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत
- मोठी बातमी! मला कोणीच वसूली करण्याचे आदेश दिले नव्हते; सचिन वाझेचा गौप्यस्फोट
- …म्हणून सारखे पेपर फुटतात; राज ठाकरेंनी सांगितलं पेपरफूटीचं कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

