Share

ST कर्मचाऱ्यांनी भडकावू भाषणाला बळी न पडता कामावर यावे – अमोल मिटकरी

Published On: 

मुंबई: विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसह एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांसंदर्भात त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालावर सरकारने आतापर्यंत निर्णय घ्यायला हवा होता, असे सरकारला सुनावतानाच सरकारच्या निर्णयापर्यंत कर्मचारी रुजू झाले तर आभाळ कोसळणार आहे का? अशा शब्दांत उच्च न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनावरही बोट ठेवले. या प्रश्नावर आत्महत्या हा उपाय नाही, तर कामावर रुजू होणे हा उपाय आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्त्या हि भयंकर गोष्ट आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी भडकावू भाषणाला बळी न पडता कामावर रुजू व्हावे. महाविकास आघाडी सरकार खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे”, असे मिटकरी यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!