Share

IPL 2022 : यंदा मुंबई इंडियन्सचे ओपनर कोण असतील? वाचा कॅप्टन हिटमॅननं दिलेलं उत्तर!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : यंदाचा आयपीएल हंगाम २६ मार्चपासून सुरू होत असून त्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. त्याआधी सर्व संघ सध्या मुंबईत तयारीत व्यस्त आहेत. पाच वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सचा गेला हंगाम वाईट होता, पण या हंगामात फ्रेंचायझी काही नवीन आणि जुन्या खेळाडूंसह तग धरण्यासाठी सज्ज झाली आहे. आगामी मोसमात मुंबई इंडियन्सची सलामी जोडी कोण असणार, या प्रश्नाचे उत्तर कर्णधार रोहित शर्माने दिले आहे.

रोहित शर्माने सांगितले, की या मोसमात तो स्वतः आणि यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन डावाची सुरुवात करेल. रोहित गेल्या मोसमात सलामीवीर म्हणूनही खेळला, तर किशनला शेवटच्या सामन्यांमध्ये सलामी देण्याची संधी मिळाली. मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेनेही रोहितच्या या निर्णयाचे समर्थन केले. तो म्हणाला, ”मला वाटते की इशान आणि रोहितमध्ये चांगली बाँडिंग आहे आणि इशान एक यष्टीरक्षक देखील आहे आणि टॉप तीनमध्ये फलंदाजी करू शकणारे कमी खेळाडू आहेत.”

सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड या मधल्या फळीतील फलंदाजांवर अतिरिक्त जबाबदारी असेल. त्याचबरोबर संघातील काही तरुण खेळाडूंनाही आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!