🕒 1 min read
मुंबई: राज्याच्या आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा झाली आहे. यामध्ये विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, भाजप महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संघटक श्रीकांत भारतीय, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे आणि भाजप नेते प्रसाद लाड या पाच नावांची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. यात विशेष बाब म्हणजे घटक पक्षाचे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपने नारळ दिला. यावरच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी खोचक टोला लगावला आहे.
“त्यांना राजकीय आत्महत्याच करावी लागली आहे. भावी उत्तरायुष्यात त्यांचं आयुष्यमान वाढो. त्यांना चांगलं आरोग्य लाभो. लढत राहा, आम्ही तुमच्यासोबत आहे, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी अशा वाटेवर तुम्हाला फडणवीस इतकं मोकाट सोडतील याची दुरान्वये कल्पना नव्हती. मला तर फार दु:ख झालं आहे. पुढील दोन-तीन दिवस तर मी काही जेवणार नाही.”, असा खोचक टोला लगावला आहे.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 8, 2022
तसेच सर्वसामान्यांचे कैवारी विनायकराव मेटे,केशव उपाध्ये,विनोद तावडे आणि सदाभाऊ खोत यांच्यावर झालेला अन्याय आम्ही कदापी सहन करु शकत नाही. त्यांच्या या अतीव दुःखात आम्ही सहभागी आहोत. आई भवानी त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.”, असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…ना हुंकार फक्त लावंगीच्या फुसक्या माळा” ; उद्धव ठाकरेंच्या सभेवर मनसेची टीका
- “निवडणूक लादल्याचा पश्चात्ताप भाजपला होईल”, संजय राऊतांचा टोला
- मुंडे भगिनींवर नेमका कुणाचा राग आहे?; संजय राऊतांचा भाजपला सवाल
- “आधी नामांतर औरंगाबादचे मग विमानतळाचे”, मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर चित्रा वाघ यांची टीका
- “हिंदुंचा खरा नेता म्हणजे फक्त राज ठाकरे”, मुख्यमंत्र्यांच्या सभेवर अमेय खोपकरांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
