Share

‘अशा मुख्यमंत्र्याचा व याला समर्थन करणाऱ्या निर्लज्ज समर्थकांचा…’, अमोल मिटकरी आक्रमक

Published On: 

मुंबई : कर्नाटकची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून समाजकंटकांनी गुरुवारी रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याने आता राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. असे असतांनाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई(Basavraj Bommai) यांनी विटंबना ही छोटी गोष्ट आहे, असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्यामुळे शिवप्रेमी अधिकच संपातले आहेत.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून यासंदर्भात ट्विट करत ते म्हणाले की,’भाजपाच्या कर्नाटकचे हे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अशी मुक्ताफळे उधळली. या महाशयाच्या नजरेत जर ही छोटी गोष्ट असेल तर अशा मुख्यमंत्र्याचा व याला समर्थन करणाऱ्या निर्लज्ज समर्थकांचा टकमक टोकावरून राजकीय कडेलोट करायला सज्ज आहोत’, असे मिटकरी म्हणाले आहेत. तसेच या ट्विटसोबत त्यांनी #shamebjp या हॅशटॅगचा वापरही केला आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेविषयी ट्विट करत बोम्मई म्हणाले की,’रातोरात महाराष्ट्र एकीकरण समितीने जे केले, त्याचा आम्ही निषेध करतो. कुणीही कायद्याविरोधात गेले, तर कारवाई ही होणारच. गृहमंत्र्यांना तसे कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. छोट्या-मोठ्या घटनेसाठी सावर्जनिक मालमत्तेचे नुकसान सहन केले जाणार नाही’, असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!