Share

आजचा विधानपरिषद निकाल म्हणजे रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवले – अनिल परब

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. मराठवाडा मतदारसंघात सतिश चव्हाण विजयी झाले आहेत, नागपूर पदवीधर मतदारसंघात आघाडीचे अभिजीत वंजारी विजयी झाले आहेत. तर पुणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड यांनी बाजी मारली आहे.

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला आहे. या जागेवर गेली कित्येक टर्म भाजपचा गाजावाजा होता. खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोनदा या मतदारसंघातून निवडून आले होते.

मात्र, यंदा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं तगडं आव्हान भाजपसमोर होतं. भाजपला रोखण्याची शक्कल या तिन्ही पक्षांनी एकत्र येत योग्य पद्धतीने राबविल्याची या निकालातून दिसत आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला आह्रे.

आजचा विधानपरिषद निकाल म्हणजे रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवले, अमरावती ही सीट आम्ही हरलो, पण ही जागा आमची नव्हती. अमरावतीची जागा ही नेहमी अपक्ष जिंकत आले आहेत. आम्हाला सांगण्यापेक्षा भाजपने आत्मचिंतन करावे.अनेक वर्षे जिंकणाऱ्या दोन सीटवर ते हरले आहेत अस अनिल परब म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!