Share

राम नवमीसाठी महाराष्ट्र सरकारने जारी केली नियमावली

Published On: 

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

पार्श्वभूमीवर सर्व सण उत्सव साजरा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रामनवमी उत्सवासाठी देखील राज्य सरकारने मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. उद्या २१ एप्रिल रोजी रामनवमी उत्सव आहे. उद्या होणारी रामनवमी अत्यंत साधेपणाने घरातच साजरी करावी असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. तसेच गर्दी आणि मिरवणूकांना देखील या दरम्यान परवानगी नसणार आहे.

जाणून घ्या काय आहे नियमावली :-

  • श्रीरामनवमी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन साजरी करतात. परंतु यावर्षी कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी हा उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे
  • दरवर्षी श्रीरामनवमी साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजेसाठी जाता येणार नाही. तसंच मंदिरात भजन, किर्तन किंवा इतर कोणते सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत.
  • मंदिराचे व्यवस्थापक/ विश्वस्त यांनी शक्य असेल तर ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करावी
  • कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी आणि मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
  • कोव्हिड प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या इतर निर्बंधांचे काटेकोर पालन करावे.

दरम्यान, गर्दी कमी होत नसल्याने राज्य शासनाने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्री, दूध विक्री दुकान (डेअरी), चिकन, मटण, मासे विक्री, खासगी वाहनांसाठी पेट्रोल पंप, कृषी संबंधित सेवा, पशुखाद्याची विक्री करणारी दुकानं सकाळी 7 ते 11 याच वेळेत खुली राहतील.सकाळी 11 वाजता दुकाने बंद झाल्यानंतर रात्री 8 वाजेपर्यंत या दुकानांद्वारे घरपोच सुविधेला मात्र परवानगी असेल असं सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. नव्या नियमावलीनुसार धार्मिक स्थळं, आठवडी बाजार, दारुची दुकानं, सर्व खासगी कार्यालये, सलून, ब्यूटी पार्लर, चहाची टपरी, स्टेडियम, मैदाने, सिनेमागृह, नाट्यगृह, कोचिंग क्लासेस पूर्णत: बंद राहतील. या आदेशाची अंमलबजावणी 20 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!