कणकवली – संचारबंदी लावूनही राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत चालल्याने सरकार चिंतेत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र संचारबंदीतही शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
जानवली गावचे सरपंच शिवराम राणे यांच्यासह अमोल राणे, रजत राणे, राजेश परब, पांडुरंग मेस्त्री यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी प्रवेश कर्त्यांना शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून पक्षात स्वागत केले. शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये,कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, सचिन सावंत,हर्षद गावडे, भालचंद्र दळवी, कन्हैया पारकर, रामू विखाळे, दामू सावंत, संदेश पटेल, राजु राठोड, विलास कोरगावकर, प्रसाद अंधारी, दादा भोगले, सत्यवान राणे, दीपक दळवी, भालचंद्र दळवी, संजय पारकर, आदी उपस्थित होते.दरम्यान, यावेळी संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन तर झालेच मात्र हा पक्ष प्रवेश होत असताना कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवलाच मात्र काहींनी मास्कही काढला असे चित्र दिसत आहे.
कोरोना रोखण्यासाठी एका बाजूला मुख्यमंत्री मोठे प्रयत्न करताना दिसून येत आहेत,राजकारण करू नका असे सांगत आहेत, मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते जर अशा पद्धतीने बेजबाबदारपणे वागत असतील तर राज्यातील जनतेने कुणाकडे पहायचे असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावत कोरोना विरोधातील लढाईत योगदान देण्याची अपेक्षा असताना या समोर आलेल्या प्रकारानंतर आता नाईक यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आता फक्त राज्याच्या नव्हे तर देशाच्या डोकेदुखीचा विषय बनला आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत राज्यात ५८ हजार ९२४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ३५१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर सध्या १.५६ टक्के एवढा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बाअदब बामुलायजा होशियार ! उमर ४५ नहीं तो क्या हुआ आखिर वो फडण २० है
- होनी को अनहोनी करणाऱ्या धोनीची डाईव्ह ; ४०व्या वर्षी ही दाखवला फिटनेस
- ‘रेमडेसिवीर मॅजिक बुलेट नाही, त्याने मृत्यू होणार नाहीत असही नाही, खरं तर…’
- रेमडेसिविरची साठेबाजी करणाऱ्यांची एनआयए-ईडी मार्फत चौकशी करा; चव्हाणांची मागणी !
- सिंघम अजय देवगनची लेक ‘न्यासा’ झाली १८ वर्षाची; अजयने दिल्या खास शुभेच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

