नवी-दिल्ली : ८ डिसें.रोजी तामिळनाडूमधील जंगलामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात देशाचे प्रथम संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत(Bipin Rawat)यांच्यासह १३ जणांचा मृत्यू असून आज(१० डिसें.) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) यांनी रावत दाम्पत्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
यासंदर्भात ट्विट करत अमित शहा म्हणाले की,’जड अंतःकरणाने जनरल बिपिन रावत जी आणि श्रीमती मधुलिका रावत जी यांना माझी अखेरची श्रद्धांजली. जनरल रावत हे शौर्य आणि धैर्याचे प्रतिक होते. त्यांना इतक्या लवकर गमावणे खूप दुर्दैवी आहे. त्यांची मातृभूमीशी असलेली बांधिलकी कायम आपल्या स्मरणात राहील.’
With a heavy heart paid my last respects to Gen Bipin Rawat Ji and Mrs Madhulika Rawat Ji.
Gen Rawat was the epitome of bravery and courage. It was very unfortunate to lose him so early. His commitment towards the motherland will forever remain in our memories. pic.twitter.com/RvlXP8L1tg
— Amit Shah (@AmitShah) December 10, 2021
बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुरिका रावत यांचे पार्थिव हवाई दलाच्या विमानाने रात्री ७ वाजून ४० मिनिटांनी दिल्लीमधील पालम विमानतळावर पोहोचले. रात्री ८.३० वाजल्यानंतर शोकसभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी, तेलंगणच्या राज्यपाल तमिलसाई सौंदरराजन, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांसह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली.
महत्वाच्या बातम्या:
- जंगलपहाडातला योद्धा शेवटी जंगलातच कोसळला- संजय राऊत
- तुमचे खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आलेत; शंभुराज देसाईंचा चंद्रकांत पाटलांना टोला
- आपल्या हक्कांबरोबरच इतरांच्या हक्कांबद्दलही जागरूक राहणे महत्वाचे-अमोल कोल्हे
- बिपीन रावत यांच्यासह इतरांवर आज अंत्यसंस्कार; पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
- मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी मानवी हक्कांचे रक्षण आवश्यक- शरद पवार


