Share

‘अतिवृष्टी झालेल्या भागात विद्युत पुरवठा, रस्ते, पूल दुरुस्तीची कामे तातडीने सुरु करा’

Published On: 

 लातूर  :- जिल्हयात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. काही मंडळामध्ये अतिवृष्टी तर काही मंडळात संततधार पावसामुळे पिकाच्या नुकसानीबरोबरच शासकीय व खाजगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करुन प्रशासनाने तात्काळ बृहत आराखडा सादर करण्याचे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण ,सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित अतिवृष्टी व कोविड-19 बाबत आढावा बैठकीत  देशमुख बोलत होते.  या वेळी लातूर ग्रामिणचे आमदार धिरज देशमुख, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, मनपा आयुक्त देवीदास टेकाळे, अधिष्ठता डॉ.मोहन डोईबळे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री म्हणाले की, जिल्हयात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. काही मंडळामध्ये अतिवृष्टी तर काही मंडळात संततधार पावसामुळे पिकाच्या नुकसानीबरोबरच शासकीय व खाजगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ ब्रहत आराखडा सादर करुन अतिवृष्टीने काही भागात रस्ते, पूल, विद्युत पुरठयाचे नुकसान झालेले आहे त्याच्या दुरुस्तीची कामे तातडीने सुरु करावेत असे सूचित केले.

पुढे पालकमंत्री देशमुख म्हणाले की, जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यास केंद्र सकरार व राज्य सरकार निश्चीतच लवकरात लवकर मदत देणार आहे. तसेच पिकविमा कंपनीही त्यांच्या करारानुसार शेतकऱ्यास विमा देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.जिल्हयातील शिवणी व सोनखेड बॅरेजेस बाबत तक्रारी येत आहेत. यापुढे तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. चौकशी अंती दोषीवर  कारवाई होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हयात कोविड-19 च्या संसर्गाबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, जिल्हयात कोवीडच्या रुग्णांची  संख्या कमी होत आहे तर कोविडच्या संसर्गापासून बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. ही समाधानाची बाब आहे पण पुढील काही दिवस सर्वांनी भौतिक अंतर पाळणे गरजेचे आहे. जिल्हयात माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेनंतर जिल्हा प्रशासनाने नाविण्यपूर्ण “स्वंय संचलन”  कल्पना राबवावी. जेणेकरुन एखादया गावातील रुग्णास त्याच्या जवळील आरोग्य केंद्रातच किंवा  रुग्णांलयातच त्यांना उपचार घेता येतील. यासर्व बाबीची जनजागृती जिल्हयात प्रभावीपणे करावी असे सूचित केले.

या बैठकीच्या प्रारंभी जिल्हयातील शहीद झालेले वीर जवान सुरेश गोरख चित्ते यांच्या वीर माता श्रीमती सुशिला चित्ते व वीर पत्नी शुभांगी सुरेश चित्ते यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 50 लाख रुपय अनुदानाचा धनादेश पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते सूपूर्त करण्यात आला. तसेच लातूर तालुक्यातील पिंपरी अंबा येथील -16 व पेठ येथील 19- लाभार्थ्यांना हक्काचे घर कबाले पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

या आढावा बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, जिल्हा शैल्यचिकित्स डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, सिंचन विभागातील कार्यकारी अभियंता, प्रशासनातील अधिकारी मोठया संख्येने उपसिथत होते. या आढावा बैठकीचे प्रस्ताविक तहसिलदार महेश सावंत यांनी केले तर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मानले.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!