🕒 1 min read
नांदेड- सद्या शेतकऱ्यांवर चहूबाजुंनी संकटे ओढवली आहेत. कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडले आहे, बोगस बियाणं, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड, खतांचा तुटवडा अशा असंख्य अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला दोन दिवसांपपूर्वी झालेल्या पावसामुळे हाती आलेलं सोन्यासारखं पिक देखील गमवावं लागलं आहे.
या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यांच्या या १ दिवसाच्या दौऱ्यामध्ये ते अक्कलकोटमधील गावांच्या नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांना धीर दिला. अतिवृष्टी होऊ नये ही माझी प्रार्थना करत आहे. पंचनामे सुरू आहे. माहिती घेत आहे. माहितीचा अभ्यास करत बसणार नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकारांशी बोलताना प्रताप पाटील यांनी सांगितले की, परतीच्या पावसाने कधी न भरून येणारे नुकसान झाले आहे. म्हणून शासनाने पंचनामे करण्यात वेळ न घालवता लवकर शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली.
अजित पवार यांनी सत्तेत नसताना शेतकऱ्यांना देण्यासाठी 25 हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. आता त्यांनीच शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 50 हजार कोटी रुपयांची मदत करावी. तिजोरीची चावी त्यांच्याकडे आहे. या संधीचा त्यांनी लाभ घ्यावा असा खोचक टोला चिखलीकर यांनी अजित दादा पवार यांना लगावला.
महत्वाच्या बातम्या-
- ‘कोरोना विषाणूच्या साथीपासून बचावासाठी अजून दोन महिने सतर्क रहा’
- चिनी सैनिकाचा भारतीय हद्दीत प्रवेश, लष्कराने घेतलं ताब्यात
- लोकप्रतिनिधीच महिलांना ‘आइटम’ म्हणत असतील तर इतरांनी काय आदर्श घ्यावा ?
- भाजप नगरसेवकांची मुंबईत महापौरांच्या विरोधात निदर्शने
- नगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप ; वाद वरिष्ठांकडे जाणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

