🕒 1 min read
बीड – बीड जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी राबविण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा आढावा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला. कोरोना विषाणूच्या साथीपासून बचावासाठी अजून दोन महिने सतर्क रहा.Covid-19 नियंत्रणासाठी बीड जिल्ह्यात चांगली कामगिरी झाल्याचे दिसून येत आहे , असेही यावेळी त्यांनी नमूद केले. याप्रसंगी मोहिमेमध्ये जिल्ह्यातील 29 लाख 53 हजार नागरिकांचा सर्वे करण्यात आला असून यासाठी सहा लाख घरांना भेटी देण्यात आल्या.
या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील 68 हजार 223 नागरिक विविध प्रकारच्या दुर्धर आजारांचे व्यक्ती दिसून आले . त्यांची उपचार व कोविड पासून बचावासाठी काळजी घेण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान 1612 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बीड व गेवराई तालुक्यातील विविध गावातील पिक नुकसानीची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आज जिल्ह्यात आगमन झाले त्यांनी गेवराई आणि बीड तालुक्यातील गावांना भेटी दिल्या.
गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथील शेतकरी संभाजी मारुतीराव मुळे यांच्या पावसाने नुकसान झालेल्या कपाशीच्या शेतीचे मा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली. पाचेगाव येथील शेतकरी विश्वंभर पंढरीनाथ बरबडे यांच्या पावसाने नुकसान झालेल्या कपाशीच्या शेतीची प्रत्यक्ष पहाणी केली .शेतकरी बरबडे यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतली.
पाडळसिंगी येथील शेतकरी रामप्रसाद ज्ञानदेव साबळे यांच्या पावसाने नुकसान झालेल्या कपाशीच्या शेतीची पाहणी करून संवाद साधला.
बीड तालुक्यातील किन्ही पाई येथील शेतकरी मीना नंदकुमार सावंत आणि लोळदगाव येथील हरिदास पाटील यांच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे महसूल राज्यमंत्री सत्तार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली संबंधित शेतकरी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतली.
या दौऱ्यामध्ये माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, कुंडली खांडे, सचिन मूळुक, युधाजित पंडित, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्यासह पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
- मुलाला पाहण्यासाठी राज ठाकरे पोहोचले थेट लीलावती हॉस्पिटलमध्ये
- चिनी सैनिकाचा भारतीय हद्दीत प्रवेश, लष्कराने घेतलं ताब्यात
- लोकप्रतिनिधीच महिलांना ‘आइटम’ म्हणत असतील तर इतरांनी काय आदर्श घ्यावा ?
- भाजप नगरसेवकांची मुंबईत महापौरांच्या विरोधात निदर्शने
- नगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप ; वाद वरिष्ठांकडे जाणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

