भोपाळ : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे रविवारी डबरा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांच्या प्रचार सभेत सहभागी झाले होते. यावेळी मतदारांना संबोधित करताना कमलनाथ यांनी भाजपा उमेदवार इमरती देवी यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही तर त्यांना माझ्यापेक्षा जास्त ओळखता. तुम्ही मला आधीच सावध करायला पाहिजे होते की, त्या काय आयटम आहेत, असे कमलनाथ यांनी इमरती देवी यांचे नाव न घेता टीका केली.
यानंतर, कमलनाथांच्या या वक्तव्याचा भाजपसह अन्य पक्षांनी देखील जाहीर निषेध केला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील संताप व्यक्त करत काँग्रेसवर निशाणा साधला होता.महिलांच्या सन्मानाचा बुरखा चढवणाऱ्या काँग्रेसने आणि सोनिया गांधींनी यावर लगाम घालावा, अशी टीका मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली होती.
दरम्यान, यानंतर चूक मान्य करण्याऐवजी तो एक सामान्य शब्द आहे असं म्हणत आपल्या चुकीचं समर्थन केलं होतं. इमरती देवी यांना या अपमानजनक वक्तव्यानंतर रडू कोसळलं होतं. दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने मध्यप्रदेश विधानसभेचे विरोधी पक्षनेते कमलनाथ यांनी केलेल्या अपमानास्पद आणि बेजबाबदार वक्तव्याची निंदा केली आहे.
दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी कमलनाथ यांच्यावर तोफ डागली आहे.’महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या प्रतिक्रियेत त्या म्हणतात, कमलनाथ जी ‘आइटम’ हा शब्द सर्रास वापरला जात असेल लोकसभेत आणि विधानसभेतसुद्धा परंतु तो एखादी वस्तू म्हणून वापरला जातो.. इथे आपण ज्यांचा उल्लेख आइटम असा केलात ती समाजातील प्रतिष्ठित महिला आहे आणि महिलेला आइटम म्हणणे म्हणजे नक्कीच अपमानास्पद आहे.आणि हो यावरून महिलांविषयीची तुमची मानसिकता सुद्धा आज सर्वांना दिसून आली.
तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात याला महत्त्व नाही परंतु तुमचे महिलांसंदर्भात काय विचार आहेत हे महत्त्वाचे आहेत. तुमच्यासारखे माजी मुख्यमंत्री म्हणजेच जबाबदार लोकप्रतिनिधी जर महिलांना आईटम हा शब्द जाहीरपणे बोलत असतील तर या देशातील महिला अत्याचाराचे प्रकार कधी कमी होतील असे वाटत नाही, कारण तुमच्यासारखे जबाबदार लोकप्रतिनिधींचा आदर्श इतर लोक घेत असतात, तुम्ही समस्त महिलावर्गाची माफी मागा अशी मागणी देखील तृप्ती देसाई यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- मुलाला पाहण्यासाठी राज ठाकरे पोहोचले थेट लीलावती हॉस्पिटलमध्ये
- चिनी सैनिकाचा भारतीय हद्दीत प्रवेश, लष्कराने घेतलं ताब्यात
- गाफील राहू नका, अतिवृष्टीचा धोका अद्याप टळलेला नाही : उद्धव ठाकरे
- माझा पराभव झाला तर कदाचित मला देशही सोडावा लागेल- डोनाल्ड ट्रम्प
- घरातील अन्नधान्य भिजलंय खायचं काय ? शेतकरी महिलेचा संभाजीराजेंना सवाल


