Share

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आंबेडकरांनी घेतली राज्यपालांची भेट

Published On: 

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचं परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. त्यांनी हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील मेल केलं आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली आहे.

‘या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख एकटे निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. राज्यपालांनी रिपोर्ट पाठवला नाही तर हे सर्वपक्षीय आहे, असे आम्ही समजू,’ असं प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.

तर, ‘पोलिसांचा वापर होत आहे आणि पोलीस आम्हाला राजकीय व्यवस्थेने आदेश दिल्याचे सांगत आहेत. आतापर्यंत १०० कोटी जमा करण्याचे पत्र समोर आले आहे. त्यामधून २,३०० कोटी रुपये जमा करण्यास आल्याचे दिसत आहे. हे पैसे कोणासाठी जमा कऱण्यात आले? यामध्ये एक मंत्री असेल वाटत नाही. पक्षीय स्तरावर हा निर्णय झाला आहे की, मंत्रिमंडळ स्तरावर याचा शोध घेतला पाहिजे. शोध घ्यायचा असला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे,’ असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

यासोबतच, ‘राज्यपालांनी केंद्र सरकार, राष्ट्रपतींकडे रिपोर्ट पाठवला पाहिजे आणि काही दिवसांसाठी राजवट लागू करणे गरजेचे आहे. सभागृह बरखास्त करता कामा नये. नवे सरकार आले तर गुन्हेगारी घटक बाहेर ठेवता येईल आणि नव्या व्यवस्थेने राज्य करता येईल अशी परिस्थिती आहे, जर रिपोर्ट गेला नाही तर हे सर्वपक्षीय आहे असं समजू, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. ‘राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सचिन वाझे यांचा जबाब लोकांसमोर आणला पाहिजे,’ अशी विनंती आंबेडकर यांनी यावेळी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!