🕒 1 min read
अंबाजोगाई : मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील पिक विमा देण्यास कंपनीकडून जाणिवपूर्वक टाळाटाळ होत असल्याने शेतकरी संतप्त झाले. परिसरातील चार गावांतील शेतकऱ्यांनी शुक्रवारी विमा मागणीसाठी अपेगाव ते अंबाजोगाई असा २५ किलोमीटर अंतराचा पायी मोर्चा काढला.
मागच्या वर्षी जिल्ह्यात तिव्र दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे विमा संरक्षण केले होते. दरम्यान, यंदा मे महिन्यापासून ओरिअंटल इन्शुरन्स कंपनीने विमा मंजूर करण्यास सुरुवात केली. परंतु, अपेगाव, धानोरा, कोपरा व अंजनपूर (ता. अंबाजोगाई) येथील बहुतांश शेतकऱ्यांना विविध कारणांनी विमा मंजूर झाला नाही. शेतकरी मागील दोन महिन्यांपासून विमा मिळावा यासाठी लोकप्रतिनिधी, कंपनीचे कार्यालय आणि शासकीय कार्यालयांत खेटे मारत आहेत.
परंतु, त्यांच्या मागणीला दाद दिली जात नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी अपेगाव ते अंबाजोगाई येथील उपविभागीय कार्यालय असा २५ किलोमीटर अंतराचा पायी मोर्चा काढला. मोर्चात आपेगाव, धानोरा, कोपरा,अंजनपुर येथील शेकडो शेतकरी सहभागी झाले.
‘३७० हटविले, तसे आरक्षणही हटवतील’, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भीती
एमआयएम मराठा-ब्राम्हण-एससी-एसटीसह सर्व समाजातील उमेदवार उभे करणार – जलील
एमआयएमने घेतलेला निर्णय योग्यचं : रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

