Share

Hair Care | ‘हे’ लावल्याने केसातील खाज आणि कोंडा होईल… जाणून घ्या!

Published On: 

🕒 1 min read

दही फक्त खाण्यातच नाही तर केस आणि त्वचेवर लावण्यासाठीही फायदेशीर आहे. दह्यात प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी7 असते, जे केस मऊ आणि निरोगी बनवतात.जर तुमच्या केसांत कोंडा झाला असेल किंवा खूप खाज येत असेल तर तुम्ही दही जरूर लावा. दह्याने तुम्ही असे हेअरपॅक बनवू शकता.

दह्यात काहीही मिसळायचे नसेल तर फक्त दही फेटून केसांना लावा. केसांच्या मुळांवर आणि खाली केसांना लावा. साधारण अर्ध्या तासानंतर केस धुवा. यामुळे केस खूप मऊ होतील.

केसांमध्ये कोंडा झाला असेल किंवा खूप कोरडे होत असतील

तर अर्धा कप दह्यात ३ चमचे मध आणि २ चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळून पॅक बनवू शकता. अर्ध्या तासानंतर केस धुवा. मधामध्ये दाहक-विरोधी आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात जे केसांना कोरडे होण्यापासून वाचवतात.

कोरड्या आणि निर्जीव केसांसाठी हा हेअर पॅक बनवा आणि लावा. यासाठी अर्धा कप दही, थोडे लिंबू आणि २ चमचे मध मिसळा. केसांना चांगले लावा आणि 30 मिनिटांनंतर पाण्याने धुवा.

केसांसाठी दही आणि खोबरेल तेल दोन्ही फायदेशीर आहे. यामुळे खोल कंडिशनिंग होते आणि केस आतून मॉइश्चरायझ होतात. यासाठी २ चमचे दही, १ चमचा मध आणि खोबरेल तेल एकत्र करून केसांना मसाज करा. थोड्या वेळाने डोके धुवा.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!