🕒 1 min read
Ambadas Danve । औरंगाबाद : विधान परिषदेचे विरोधी पक्ष अंबादास दानवे यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, विरोधी पक्षनेते पद मिळाल्यानंतर जबाबदारी नक्की वाढली. पण बंडखोर आमदार आणि भारतीय जनता पार्टी यांचे सगळे मंत्री मिळून आणखी दोन मंत्री वाढवले तरी सर्वसामान्य शिवसैनिक या मंत्र्यांना धडा शिकवणार. तुम्हाला सांगतो ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. शिवसैनिकांच्या बळावर आम्ही यांना धडा शिकवू असे दानवे म्हणाले.
तसेच पुढे हे सरकार जास्त गुजरातकडे पळते. या सरकारने 6000 कोटी निधी बुलेट ट्रेनसाठी दिला. परंतु शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत हे सरकार देत नाही जनतेने या गोष्टीकडे उघड्या डोळ्याने बघितले आहे. जनता यांना निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवेल भारतीय जनता पार्टी हे मित्रपक्ष संपवण्यात निघालेली आहे महाराष्ट्रामध्ये भाजप कुठेही नव्हती त्यावेळेस शिवसेनेसोबत येऊन एक शक्ती प्राप्त केली. यांनतर आता हीच भारतीय जनता पार्टी शिवसेना फोडण्यासाठी काम करत आहे.
सध्या फुले शाहूंचा महाराष्ट्र हा गदरांचा महाराष्ट्र झालेला आहे. भ्रष्टाचारी मंत्र्यांचा महाराष्ट्र झालेला आहे. एकीकडे संजय राठोड यांच्यावर भाजपने वर्षभरापूर्वी आरोप केले होते. असा कोणता बदल एका वर्षात झाला. अब्दुल सत्तार यांच्यावर टीईटी घोटाळा सुरू आहे. नुकतेच त्यांची मुलीच नव्हे अनेक नातेवाईकांनी बोगस प्रमाणपत्र देऊन टीईटीची परीक्षा पास केल्या आहेत. पुढे त्यांच्याच संस्थेत नोकरी दिलेले आहे. स्वतःच्या संस्थेत अशा पद्धतीचे पुरावे असताना सुद्धा हे लोक मंत्रिमंडळात गेल्याचे दानवे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Deepak Kesarkar । दीपक केसरकारांचा शरद पवारांना सल्ला, म्हणाले…
- Jalna । जालन्यात इनकम टॅक्सचा मोठा छापा, तब्बल 58 कोटी कॅशसह 32 किलो सोनं जप्त, 390 कोटीची मालमत्ता जप्त
- Shiv Sena । दिल्लीशिवाय आपले काही अडत नाही हे नितीशकुमारांनी दाखवून दिले; शिवसेनेचं टीकास्त्र
- Raosaheb Danve | महिलांना पुढील विस्तारात संधी मिळेल – रावसाहेब दानवे
- Sanjay Rathod । एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळात संधी का दिली; संजय राठोडांनीच सांगितलं यामागील कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

