🕒 1 min read
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी एक व्हिडीओ ट्विट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केला आहे. भाजप पक्षाच्या तिरंगा रॅलीत असलेल्या ध्वजावरील अशोक चक्र गायब ? हा काय प्रकार आहे मोदीजी?, असा सवाल मिटकरी यांनी केला आहे. भाजपच्या वतीने भारतीय स्वतंत्र्यांच्या ७५ व्या वर्षानिमित्त देशभरात कार्यक्रम करण्यात येत आहेत. यामध्ये तिरंगा रॅलीचे सुद्धा आयोजन आहे. मात्र रॅलीतील तिरंग्यावरुन विरोधक मोदी सरकारवर टीका करत आहेत.
अमोल मिटकरी राजकारणातले थिल्लरपणा-
अमोल मिटकरी यांनी केलेल्या प्रश्नाला भाजपचे प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांनी उत्तर दिले आहे. मेश्राम यांनी अमोल मिटकरी यांच्यावर बोचरी टीका केली. “अमोल मिटकरी असे व्हिडीओ पोस्ट करून सरळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न करतात. आधी अमोल मिटकरी यांनी हे स्पष्ट करावे, की हा व्हिडिओ केव्हाचा आहे, कुठला आहे, हे न सांगता थेट प्रश्न करणे म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे. अमोल मिटकरी हे राजकारणातले थिल्लरपणा आहे,” असे धर्मपाल मेश्राम म्हणाले.
काँग्रेसने देखील भाजपवर केली टीका-
काँग्रेसने देखील भाजपवर टीका केली आहे. परभणीत भाजपचे कार्यकर्ते भाजपचे चिन्ह आणि नाव असलेला तिरंगा घरोघरी वाटताना सापडले. हा राष्ट्रध्वजाचा अपमान आणि देशद्रोह नाही का?, असा प्रश्न काँग्रसने उपस्थित केला आहे. तिरंग्याच्या नावाखाली पक्षाचा प्रचार करायला ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ मोहीम हाती घेतली का?, असा सवालही काँग्रसने उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या :
- Pankaja Munde। पंकजा मुंडे यांना भविष्यात शिंदे सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत
- Dale Steyn | डेल स्टेनने केला खतरनाक स्टंट, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, अरे बापरे..!
- Shiv Sena । उद्धव ठाकरेंना मोठा दणका! शिंदे गट दादरमध्येच नवं सेनाभवन उभारणार
- Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुलेट स्वारी
- Sourav Ganguly | सौरव गांगुलीचे क्रिकेटमध्ये पुनरागमन! ‘या’ सामन्यात संघाचे नेतृत्व करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

