🕒 1 min read
मुंबई : काही दिवसांपूर्वीच राज्यात सत्ता बदल झाला. विरोधी बाकावर बसलेला भाजप पक्ष पक्षाशी बंडखोरी केलेल्या शिंदे गटाबरोबर युती करून सत्तेत आला. त्यातच आता राज्यात मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. ज्यामध्ये शिंदे गटातील ९ आणि भाजपमधील ९ अशा एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यामध्ये एकाही महिला आमदारच किंवा अपक्ष आमदाराचा समावेश नाही. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा हे काहीसे नाराज दिसले. त्यावरूनच आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तार काहींसाठी गोड तर काहींसाठी कडू ठरला, असे म्हणत त्यांनी बच्चू कडूंना टोला लगावला.
भाजपला मित्रपक्षांना आणि प्रादेशिक पक्षांना संपवण्यातच अधिक रस आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने आज उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरेंनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे कौतुक देखील केले. “नितीशकुमार यांनी भविष्यातील धोका ओळखून भाजपाची साथ सोडली आणि बिहारमध्ये पुन्हा सत्ता स्थापन केली. त्यामुळे जी अवस्था महाराष्ट्रात शिवसेनेची झाली त्यापासून तशी अवस्था होण्यापासून ते वाचले. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. परंतु आम्हाला 2019 च्या निवडणुकांमध्येच भाजपची भूमिका आणि भविष्यातील खेळी लक्षात आली होती. त्यामुळेच येत्या काळात सुद्धा भाजपची रणनिती समजून घेऊन त्याविरोध लढणे गरजेचे आहे.”, असे मत त्यांनी व्यक्त केले.
एकनाथ शिंदे उभारणार नवं सेनाभवन
उद्धव ठाकरेंना टक्कर देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी नवा ‘मास्टर प्लॅन’ तयार केलाय. त्यानुसार दादरमध्येच नवं ‘सेनाभवन’ उभारणार येणार असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे. सरवणकर म्हणाले की, “आता लवकरच स्वतंत्र शाखा उभारल्या जातील, शाखाप्रमुखांची घोषणा होईल. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं काम जोरदार सुरू होईल. शिंदे साहेबांच्या कामाची गती पाहता त्यांना चांगल्या कार्यालयाची गरज आहे. त्यामुळे दादरमध्येच त्यांचं एक मुख्य कार्यालय असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली इतर शाखा काम करतील.”
महत्वाच्या बातम्या:
- Dale Steyn | डेल स्टेनने केला खतरनाक स्टंट, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, अरे बापरे..!
- Shiv Sena । उद्धव ठाकरेंना मोठा दणका! शिंदे गट दादरमध्येच नवं सेनाभवन उभारणार
- Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुलेट स्वारी
- Sourav Ganguly | सौरव गांगुलीचे क्रिकेटमध्ये पुनरागमन! ‘या’ सामन्यात संघाचे नेतृत्व करणार
- Chandrashekhar bawankule | चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष तर आशिष शेलार मुंबईचे अध्यक्ष


