🕒 1 min read
मुंबई : गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. यावेळी त्यांनी शिवसेनेतील ४० आमदारांनी पाठिंबा दर्शवाला. त्यानंतर पुढे १२ खासदार आणि अनेक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदेंना पाठिंबा दिला. त्यांनतर सुरु झालेले आरोप प्रत्यारोपांचे सामने अजूनही थांबायचं नाव घेत नाहीत. कधी महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट, भाजप आणि मनसे, तर कधी मूळ शिवसेना विरुद्ध शिंदे गट असे सामने रंगताना दिसून येत आहेत. त्यातच आता खरी शिवसेना आमचीच असल्याचा शिंदे गट दावा करत आहे. तर शिवसेना आणि शिवसेनेचं पक्ष चिन्ह नक्की कुणाचं हा वाद आता कोर्टात पोहचला आहे. त्यावरूनच आज शिंदे गटाचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देत शिंदे गटाची बाजू मांडली आहे.
“आमची बाजू खूपच लंगडी आहे असं समजू नका. आम्ही कोर्टाचा मान राखत आहोत त्यामुळे आम्ही आमची बाजू फक्त कोर्टाचं मांडत आहोत. पण आमचे विरोधक मात्र वेगवेगळ्या वकिलांना घटनातज्ञ म्हणून मीडियासमोर आणतात आणि शिंदे गट कसा दोषी आहे, हे त्या वकिलांमार्फत सांगितलं जात आहे. पण खरं तर आमच्या बाजूने बहुमत असल्यामुळे आम्हीच मूळ शिवसेना आहोत. हीच आमची ठाम भूमिका आहे. आम्ही कोर्टाचा मान राख असल्याने आम्ही याबाबतीत कोणत्याही मीडिया ट्रायल घेतलेल्या नाहीत. शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली आणि त्यामुळे बाळासाहेबांचे विचार जे जपतात तेच खरी शिवसेना आहेत. म्हणजेच आम्हीच खरी शिवसेना आहोत.”, असे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
ठाकरेंची भाजपवर टीका
भाजपला मित्रपक्षांना आणि प्रादेशिक पक्षांना संपवण्यातच अधिक रस आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे कौतुक देखील केले. “नितीशकुमार यांनी भविष्यातील धोका ओळखून भाजपाची साथ सोडली आणि बिहारमध्ये पुन्हा सत्ता स्थापन केली. त्यामुळे जी अवस्था महाराष्ट्रात शिवसेनेची झाली त्यापासून तशी अवस्था होण्यापासून ते वाचले. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. परंतु आम्हाला 2019 च्या निवडणुकांमध्येच भाजपची भूमिका आणि भविष्यातील खेळी लक्षात आली होती. त्यामुळेच येत्या काळात सुद्धा भाजपची रणनिती समजून घेऊन त्याविरोध लढणे गरजेचे आहे.”, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या:
- Dale Steyn | डेल स्टेनने केला खतरनाक स्टंट, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, अरे बापरे..!
- Shiv Sena । उद्धव ठाकरेंना मोठा दणका! शिंदे गट दादरमध्येच नवं सेनाभवन उभारणार
- Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुलेट स्वारी
- Sourav Ganguly | सौरव गांगुलीचे क्रिकेटमध्ये पुनरागमन! ‘या’ सामन्यात संघाचे नेतृत्व करणार
- Chandrashekhar bawankule | चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष तर आशिष शेलार मुंबईचे अध्यक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

