Share

१०० युनिट वीज बिल माफ करणार, असं आपण सांगितलंच नव्हतं, उर्जामंत्र्यांचा दावा

Published On: 

नागपूर : लॉकडाऊन दरम्यान आलेल्या वाढीव वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. कोरोनामुळे अनेकांना आर्थिक झळ सोसावी लागत असतानाच महावितरण विभाग वाढीव वीज बिल आकारात असल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात दिवाळीपासून वाद सुरु आहे. भाजपने वाढीव वीज बिलाविरुद्ध आंदोलने केली होती.

लॉकडाऊन काळातील लाईट बिलांवर, तीन महिन्याची सवलत देण्याचं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले होते. मात्र, दिवाळीनंतर गोड बातमी देण्याची ऊर्जामंत्र्यांची घोषणा हवेत विरली.

दिवाळीपर्यंत नागरिकांना लवकरच गोड बातमी मिळेल असे संकेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये दिले होते. १०० युनिटपर्यत वीज फ्री देण्याबाबत मी ऊर्जामंत्री म्हणून सांगितलं आहे. यंदा दिवाळीत नागरिकांना नक्कीच सप्रेम भेट मिळेल, असे नितीन राऊत यांनी २०२० मध्ये सांगितले. मात्र, आता राऊत यांनी अजूनही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे विरोधक त्यांच्यावर यु-टर्न घेतल्याचा आरोप करत आहे.

दरम्यान, १०० युनिट वीज बिल माफी देणार, असं आपण सांगितलंच नव्हतं असा दावा नितीन राऊत यांनी केला आहे. १०० युनिट वीज बिल माफीबाबत एक समिती बनवली होती, असं आपण सांगितलं होतं. पण त्या समितीची बैठक झाली नाही म्हणून त्यात काहीच झालं नाही, असंही राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!