अमरावती: राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी अपक्ष आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी अमरावतीमधील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी न घेता बसवला होता. यामुळे बराच वाद झाला असतानाच आता अमरावती प्रशासनाने हा पुतळा या ठिकाणाहून काढला आहे. आज पहाटेच पोलीस बंदोबस्तात हा पुतळा काढण्यात आला आहे. यासाठी काल रात्री राजापेठ उड्डाणपुलाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. मात्र यामुळे आता अमरावतीतील राजकारण चांगलेच तापले आहे.
या प्रकारानंतर खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) म्हणाल्या, जे शिवभक्त गेल्या तीन वर्षांपासून परवानगी मागून थकले त्यांना परवानगी मिळाली नाही, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी कुणाची परवानगी कशाला हवी? असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. तसेच ज्या महाराजांच्या मुळे महाराष्ट्र घडला, मात्र आता कुठे बाळासाहेब ठाकरेंचे आदर्श, कुठे गेले बाळासाहेब ठाकरेंचे विचार, असा सवाल करत नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
त्याच सोबत आमदार रवी राणा यांनी देखील शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे सरकार शिवप्रेमींची गळचेपी करत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला. तसंच ‘आताची शिवसेना ही शिवसेना नसून ती काँग्रेस सेना झाली आहे’ अशी टीका रवी राणा यांनी यावेळी केली आहे. पुढे बोलताना रवी राणा म्हणाले, एखाद्या अतिरेक्यांप्रमाणे आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलं. ही पद्धत अत्यंत चुकीची असल्याचं रवी राणा यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी परवानगी कशाला हवी? नवनीत राणांचा हल्लाबोल
औरंगाबाद प्राणीसंग्रहालयात बछड्यांसाठी जागा नाही; म्हणे आता प्रजननच रोखा!
‘दुगाण्या झाडायला काय अक्कल लागते?’; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

