मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सचं (Football Maharashtra Centre Of Excellence) उद्घाटन करण्यात आलं. यावेळी फुटबॉल खेळाविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी खेळाडूंना प्रोत्साहित करत नुसते मैदाने बनवून उपयोग नाही तर भारताने जगभरात आपल्या खेळणे दरारा निर्माण करायला पाहिजे, असं प्रोत्साहन दिले.
या उद्घाटन कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन कॉनफरन्सद्वारे उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना ठाकरेंनी भाजपला चांगलच फटकारले आहे. विरोधकांनी केलेल्या टीकांना यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत टोलेबाजी केली आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या व्हॉट्सअॅप चॅटबोट सेवेचे लोकार्पण करताना प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही असा टोला विरोधकांना लगावला होता. त्यावर विरोधकांनी देखील मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे विरोधकांना उद्देशून म्हणाले, फुटबॉल हा पायाने खेळायचा खेळ जरी असला तरी यासाठी डोकं लागतं. बुद्धीबळ खेळताना जसा विचार करावा लागतो, तसाच फुटबॉल खेळताना विचार करावा लागतो. फुटबॉल खेळताना अत्यंत वेगात निर्णय घ्यावा लागतो, असं सांगतानाच दुगाण्या झाडायला काय अक्कल लागते? दुगाण्या झाडायच्या तर रोज दुगाण्या झाडत असतो. परंतु त्या दुगाण्या झाडणं वेगळं, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या:
जायचे होते परभणीला; परंतु झाले असे काही मायलेकींनी घेतली धावत्या रेल्वेतून उडी!
‘नुसतं फुटबॉलचं स्टेडियम उभारून चालणार नाही तर…’; उद्धव ठाकरेंचे खेळाडूंना आवाहन
मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे निवडणूक आयोगाला पत्र; केली ‘ही’ मागणी
“जिंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा”, नवाब मलिकांचा रवी किशन यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

