Share

बसमध्ये चालकाला आली फीट अन् ‘ति’ने पकडले स्टेअरिंग

Published On: 

पुणे: सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ जाम व्हायरल होत आहे. भरधाव वेगाने जाणार्‍या मिनी बसचा चालक अचानक बेशुद्ध झाला.आणि बस अनियंत्रित झाली. मात्र ही परिस्थिती एका महिलेच्या प्रसंगावधानाने नियंत्रणात आली.

प्रवाशांमध्ये बसलेल्या एका महिलेने प्रसंगावधान बाळगत परिस्थिती नियंत्रणात आणली. पुण्यातील वाघोली येथील योगिता सातव(Yogita Satav) या ४२ वर्षीय महिला चालकाला बेशुद्ध पडलेले पाहून तात्काळ उठल्या आणि बसच्या स्टेअरिंगचा ताबा आपल्याकडे घेतला. यात आश्चर्य म्हणजे त्यांनी पहिल्यांदाच बसचे स्टेअरिंग हातात घेतले होते. मात्र त्यांच्या हिमतीने सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. हाच व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

योगिता सातव यांनी सुमारे २५किमी बस चालवत चालकाला रुग्णालयात पोहचवले. वाघोली येथील वीस जण मोराची चिंचोली येथे सहलीसाठी गेले असताना ७ जानेवारी रोजी ही घटना घडली होती. दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता प्रवाशी परत येत होते. अचानक बस चालकाने अस्वस्थतेची तक्रार केली. त्यानंतर ड्रायव्हरला चक्कर येऊ लागली, त्यामुळे त्याला काहीच दिसत नव्हते.अशा स्थितीत चालकाचे बसवरही नियंत्रण राहिले नाही. आणि मग यास्थितीत योगिता सातव यांनी बसचा ताबा आपल्या हातात घेतला.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!