औरंगाबाद: बछड्यांना ठेवण्यासाठी पुरेसे पिंजरे नसल्यामुळे प्राणिसंग्रहालयातील ‘मिटींग’ सध्या बंद ठेवा असे आदेश केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दिले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने प्राणिसंग्रहालयातील नर आणि मादी वाघांना एक वर्षांपासून वेगवेगळे ठेवले आहे. औरंगाबाद येथील महापालिकेचे प्राणिसंग्रहालय वाघांच्या उत्पत्तीसाठीचे पोषक प्राणिसंग्रहालय म्हणून ओळखले जाते.
प्राणिसंग्रहालयात प्रमोद आणि भानुप्रिया ही वाघांची पहिली जोडी भुवनेश्वर येथील प्राणिसंग्रहालयातून आणण्यात आली. त्यानंतर २००५ मध्ये पंजाब येथील चतबिर झु मधून दोन जोड्या आणण्यात आल्या. या वाघांच्या जोड्यांपासून प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या वाढत गेली. सुमारे चाळीस वाघांनी आतापर्यंत प्राणिसंग्रहालयात जन्म घेतला. देश आणि राज्यातील इतर प्राणिसंग्रहालयांकडून झालेल्या मागणीनुसार केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या आदेशाने औरंगाबाद महापालिकेने वाघ पुरवले. मुंबई, पुण्यासह पंजाब, मध्यप्रदेश या राज्यातील प्राणिसंग्रहालयांना देखील औरंगाबादहून वाघ पुरवण्यात आले.
गतवर्षी समृध्दी या पिवळ्या वाघिणीने पाच बछड्यांना जन्म दिला. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या एकदम वाढली. मिटमिटा भागात महापालिका सफारी पार्क उभारण्यार आहे. या ठिकाणी टायगर सफारी केली जाणार आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने आदेश काढून वाघांचे प्रजनन बंद ठेवण्याचे कळवले असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त सौरभ जोशी यांनी दिली. प्राधिकरणाच्या आदेशामुळे एक वर्षांपासून नर आणि मादी वाघांना वेगवेगळे ठेवले जात आहे. महापालिकेच्या सध्या असलेल्या प्राणिसंग्रहालयाचे क्षेत्रफळ कमी आहे. त्यामुळे वाघांच्या पिंजऱ्यांची संख्या देखील कमी आहे. त्यामुळे वाघांच्या प्रजननावर निर्बंध आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
‘नया नया पंछी ज्यादा फडफड करता है’; विजय वडेट्टीवार यांची पडळकरांवर टीका
‘दुगाण्या झाडायला काय अक्कल लागते?’; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला
“मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी”, किरण मानेंची नवी फेसबुक पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

