Share

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी परवानगी कशाला हवी? नवनीत राणांचा हल्लाबोल

Published On: 

अमरावती: राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी अपक्ष आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी अमरावतीमधील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी न घेता बसवला होता. यामुळे बराच वाद झाला असतानाच आता अमरावती प्रशासनाने हा पुतळा या ठिकाणाहून काढला आहे.आज पहाटेच पोलीस बंदोबस्तात हा पुतळा काढण्यात आला आहे. यासाठी काल रात्री राजापेठ उड्डाणपुलाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. मात्र यामुळे आता अमरावतीतील राजकारण चांगलेच तापले आहे.

कार्यकर्त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही घोषणाबाजी सुरु आहे. दरम्यान पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटकही केली आहे. यावेळी स्वतः नवनीत राणा ( MP Navneet Rana) यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

जे शिवभक्त गेल्या तीन वर्षांपासून परवानगी मागून थकले त्यांना परवानगी मिळाली नाही, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी कुणाची परवानगी कशाला हवी? असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी तीन वर्षे परवानगी न मिळाल्याने आम्ही पुतळा बसवला. ज्या उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मतदान मागतात, ते छत्रपती शिवाजी महाजांचे पुतळे हटवता. अशी टीका त्यांनी केली आहे. ज्या महाराजांच्या मुळे महाराष्ट्र घडला, मात्र आता कुठे बाळासाहेब ठाकरेंचे आदर्श, कुठे गेले बाळासाहेब ठाकरेंचे विचार? असा सवाल करत नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

दरम्यान पुतळा काढल्यानंतर अमरावती शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे मुर्दाबादच्या घोषणाही आता दिल्या जात आहेत. त्यामुळे येथील वातावरण अजूनच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!